पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादूर यांचे अपूर्व युक्तिचापल्य ५५

असे तिन्ही दंड सांगितले आहेत. लोकदंड व धर्मदंड हे आचार व प्रायश्चित्तप्रकरणात आहेत आणि राजदंड व्यवहारांत स्त्रीसंग्रह प्रकरणांत आहे. यापेक्षां आणखी व्यवस्था ती कोणती असावयाची ? खेरीज ज्याप्रमाणें हल्लीं दिवाणी केली तरी फौजदारी टळत नाहीं त्याप्रमाणेंच एक दंड भोगिला तरी दुसरा दंड टळत नाहीं असे शास्त्रग्रंथातून सांगितलें आहे.

आता इतर स्मृती काय म्हणतात तें पाहूं. याज्ञवल्क्य स्मृतीत:--

स्त्रीभि: भर्तृवच: कार्यमेष धर्म: पर:स्त्रिय:
आशुद्धे: संप्रतीक्ष्यो हि महापातकदूषित: |

असे सांगून पुढें-

हृताधिकारा मलिनां पिंडमात्रोपजीविंनीं
परिभूता अध:शयां वासयेद्वभिचारिणीं |

व्यभिचारिणी स्त्रियेस पोटापुरती जाडीभरडी भाकर देऊन घरात ठेवावी असे सांगितले आहे तसेंच अन्य स्मृतींत--

व्यभिचारे स्त्रियो: मौड्यमध: शयनमेव वा |

म्हणजे घरीं ठेविली तरी मुंडनाची कडक शिक्षा दिली आहे. आतां येथेंच काय तें रा.ब.चे गौडबंगाल सुरू झाले आहे. हिदुधर्मशास्त्रात स्त्रीपुरूषाचा विवाहसंबंध जन्माचा असल्यामुळें बायकोस जर तो तोडता येत नाही तर तीस नव-याकडून अन्नवस्त्र (भिकार का होईना) नेहमी देवविलें पाहिजे हें आमच्या धर्माचे तत्त्व नीट न समजता रा.ब. म्हणतात कीं, 'घरी ठेवावी व पोटास द्यावें' असे सागितले यावरून त्या वेळेस व्यभिचारिणी स्त्री संग्रहार्ह समजत ! पण विज्ञानेश्वर काय म्हणतात पाहा -- स्ववेश्म्न्येव वासयेत् | वैराग्यजनार्थं न पुन: शुद्धर्थं | यत्पुंस: परदारेषु तच्चैना चारयेद्व्रतमिति पृथक्प्रायश्चित्तोपदेशात | म्हणजे घरीं ठेवावी पण ती कशाकरितां ? विरक्ति उत्पन्न होण्यासाठीं, शुद्धीकरिता नव्हे; कारण शुद्धीकरितां मनूनें "यत्पुंस:" इत्यादि निराळें प्रायश्चित्त सांगितलें आहे. परंतु आमच्या रा.ब.स वरील सर्व अर्थ अनुकूल नसल्यामुळें त्यांनी "स्ववेश्म्न्येव वासयेत्" एवढाच टीकेपैकी भाग उचलला आहे. बाकीची टीका त्यास दिसते कशाला ? वाचकहो !! जरा दम खा; पुढें याहूनही विशेष बहार आहे. येथपर्यंत याज्ञवल्क्यस्मृतीची मनुस्मृतीशीं एकवाक्यता झाली. याज्ञवक्ल्य स्मृतींतील पुढील वचन असें आहे:--

व्यभिचारादृतौ शुद्धि: गर्भे त्यागो विधीयते
गर्भभर्तृवधादौ च तथा महति पातके |