पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ लो. टिळकांचे केसरींतील लेख

स्वैच्छ व्यभिचारास वरील मनुवचनाप्रामाणें पूर्ण प्रायश्चित्त आहे. " व्यभिचारप्रकरणीं अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे उत्तम जातीच्या वर्णांनीं खालच्या जातीशीं आणि खालच्या जातींनीं वरच्याशी व्यभिचार केल्यास निरनिराळा दंड सांगितला आहे हें वाचकास येथें सांगितले पाहिजे.कत्यायन स्मृतीत पुरूषांच्या निम्मे स्त्रियांस दंड असें जें सांगितलें आहे त्याची व्यवस्था मनुवचनाशीं एकवाक्यता करण्याकरितां नेहमींच्या सरणीप्रमाणें कुल्लूक काय करितात हेंही वर निर्दिष्ट केलेंच आहे. आता मनूनें व्यभिचारास राजदंड काय सांगितला आहे तो पहा. सध्या सजातीय व्यभिचाराचाच विचार करूं--

शतानि पंच दंड्य: स्यात् इच्छन्त्या सह संगमे |

असा व्यवहारप्रकरणीं मनूनें स्त्रीच्या इच्छेने व्यभिचार करणा-या पुरूषास दंड सांगितला आहे. साधारणपणे "यत्पुंस:परदारेषु" इ. वचनावरून स्त्रीसही हाच दंड आहे. पण जर द्रव्य, रूप, इत्यादिकांच्या जोरावर नव-यास तुच्छ मानून एखादी स्त्री व्यभिचार करील तर मनूंत तीस :--

भर्तारं लंघयेद्यातु स्त्री ज्ञातिगुणदर्पिता
तां श्वभि: खादयेद्राजा संस्थाने बहुसंस्थिते |

राजानें कुत्र्याकडून खाववावें अशी कडक शिक्षा सागितली आहे. रा.ब.म्हणतात कीं, हें वचन मूळ यमस्मृतीतील असून ब्राह्मणस्त्री शूद्राशी व्यभिचार करील तर तीस ही शिक्षा आहे. रा. ब. यमस्मृति पूर्वीची समजतात कीं काय कोण जाणे? यमस्मृतीतील वचन असे आहे:--

वृषलं सेवते या तु ब्राह्मणी यदमोहिता
ता श्वभि: खादयेद्राजा संस्थाने वध्यघातिना |

पण या वचनाने मनुस्मृतीतील वचनाचा कसा बोध होतो हे आम्हास समजत नाहीं. ग्रंथ लावण्याची जी सरणी आम्ही पूर्वी दिलीं आहे त्यावरून मनुस्मृति स्पष्टार्थ असता तिचा यमस्मृतीनें बोध होत नाहीं. करितां मनुस्मृतीतील व यमस्मृतीतील शिक्षा निरनिराळ्याच मानिल्या पहिजेत. मनूवरील सर्व टीकाकारांस हाच पक्ष संमत आहे. म्हणजे ते मनुस्मृतींतील वचन सामन्यत: स्त्री गर्वाने शिरजोर होऊन व्यभिचार करील तर तीस लागते असे म्हणतात. यमस्मृतींतील वचन विशिष्ट आहे, व शिवाय त्यांत ज्ञाति-धन-दर्पाचा उल्लेख नाही. हा दोहोंतील भेद आहे. रा.ब.जो अर्थवाद करूं पाहातात त्यातही कांहीं हंशील नाहीं; कारण तसा अर्थवाद एकतर कोणत्याही टीकाकारानें केला नाहीं आणि दुसरें रा.ब. असा अर्थवाद करण्यास जी कारणें देतात तीं सर्व भ्रातिमूलक आहेत असे वर दाखविलेंच आहे. साराश, मनूने व्यभिचारास धर्मदंड, लोकदंड व राजदंड