पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर यांचे अपूर्व युक्तिचापल्य ४९


असाच त्याचा अर्थ आहे व असाच टीकाकारांनींही केला आहे. 'रक्षति' याचा अर्थ कुल्लूकांनीं दिला नाहीं, पण मेधातिथींनीं त्याचा अर्थ "अनर्थ, अनाचार वगैरेपासून रक्षण करावें" असा सांगितला आहे. याज्ञवल्क्यस्मृतींत अशाच अर्थाचा:-

रक्षेत्कन्यां पिता विन्नां पति: पुत्रास्तु वार्धके
अभावे ज्ञातयस्तेषां न स्वातंत्र्यं क्वचित्म्त्रिय:|

असा श्लोक आहे. त्यावर टीका करितांना विज्ञानेश्वरांनी "रक्षेत-अकार्यकरणीद्रक्षेत्" म्हणजे 'रक्षण करावें' याचा हवें तें करूं देऊं नये असा अर्थ दिला आहे. पण ह्या अर्थाच्या आधारासाठीं इतकें खोल जाण्यास नको. मनूचेंच वरील श्लोकातील अर्थ दुस-या शब्दानीं ५ व्या अध्यायांत सांगितला आहे तो असा:-

बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता
न स्वातंत्र्येण कर्त्यव्यं किंचित्कार्य गृहेष्वपि |
बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत् स्त्री स्वतंत्रता |

यावरून "स्त्रीस लहानपणी, तरूणपणीं किंवा वृद्धापकाळीं घरांतील देखील कोणचीच गोष्ट अनुक्रमें पिता, पति आणि पुत्र याच्या आज्ञेवांचून करिता येत नाही." असा "न स्वातंत्र्यमर्हति" याचा व 'रक्षेत्' याचा 'वशे स्थापयेत्' असा अर्थ मनूस अभिप्रेत आहे हें उघड होतें. याज्ञवल्क्यस्मृतींत असेंच सांगितलें आहे. नारदस्मृति आहे:-

मृते भर्तर्यपुत्राया: पतिकक्ष: प्रभु: स्त्रिय:
विनियोगात्मरक्षासु भरणेषु च ईश्वर: |
परीक्षीणे पतिकुले निर्मनुष्ये निराश्रये
तत्सपिंडेषु चासत्सु पितृपक्ष: प्रभु: स्त्रिय: |
पक्षद्वयावसानेषु राजा भर्त्ता स्मृत: स्त्रिय:
स तस्याभरणं कुर्यान्निगृह्नीयार्पथश्च्युतां |

यावरूनही सासरचीं माणसें नसल्यास माहेरची, तींही नसल्यास राजा; एकूण कोणी ना कोणी तरी स्त्रीस आपल्या ताब्यांत ठेवावें असे स्पष्ट होतें. इतक्या स्मृतींची व टीकाकारांची या बाबतींत एकवाक्यता असतां रा.ब.सच त्याच्या मनाजोगा अर्थ सांगणारा 'दुराग्रहा' वांचून दुसरा कोण टीकाकार सापडला असेल याची वाचकांनींच कल्पना करावी. रा.ब.चा पुढील अर्थवाद तर याहूनही मनोरम आहे. ते म्हणतात की, 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' या