पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहदुर रानडे यांचें अपूर्व युक्तिचापल्य ४५

तुमच्या पूर्वीच्या शास्त्रोक्त चाली ज्या सरकारानें बंद केल्या आहेत त्या पुन: स्थापित करण्याचा आमचा उद्योग आहे" असे आपल्या उद्योगास रूप देण्याचा सुधारकांचा प्रयत्न होता. अथवा वामनरावजींनी आपल्या पत्रांत आम्हास ज्यासाठीं वृथादूषण दिलें आहे की, "आम्ही राष्ट्रीय व धर्माभिमानाची खोटी प्रशंसा करून लोकाची मने आपल्यास अनुकूल करून घेतों" तेच हे सुधारक करूं पाहात होते. आम्हांस हा लपंडाव पसंत नव्हता. ह्यामुळे मि. तेलंग याच्या मतासारखेंच-लग्न लहानपणी होवो अगर मोठेपणी होवो, गर्भाधान झालें असो वा नसो, कसे असले तरी देशकालानुरूप स्त्रियास ह्या अपराधाकरिता हल्ली कैदेंत टाकणे बहुतेक निष्फळ व अयोग्य आहे- असें जरी आम्ही मत दिले होतें, तरी सुधारकाच्या ह्या अनर्थकारक कोटिक्रमाने लोकाने फसून भलतेच मत देऊ नये एवढ्यासाठीं त्यातील सत्याश आम्हास बाहेर काढावा लागला. परंतु आता आम्हीं किंवा मि. तेलंग हे जितकी या बाबतीत सुधारणा करण्यास तयार आहेत तितके सुधारकास पुरी नसल्यामुळें हिंदुधर्मशास्त्रातून पुन: आणखी काहीं निघाल्यास पहावे या बुद्धीनें रा. ब. रानडे यानी यंदाच्या येथील वक्तृत्वसमारंभात या विषयावर भाषण करून आपल्या बुद्धिकौशल्यानें लोकांस असे भासविण्याचा प्रयत्न केला कीं, आमचे स्मृतिकार स्त्रियावर इतके फिदा असत कीं, व्यभिचाराबद्दल देखील त्यास ते मोठेसे शासन करीत नसत, मग नव-यास नुसतें सोडून दिल्याची काय कथा ? रा. ब. च्या मते वरील प्रकार आपल्या राष्ट्रास भूषणास्पदच असल्यामुळे त्यांनी केलेल्या अर्थवादाचें किंवा लटपटीचें त्यास काहीं वाईट वाटत नसेल हे आम्ही जाणतों. तथापि बहुजनसमाजानें जोंपर्यंत रा. ब. चे हें मत ग्रहण केले नाहीं तोपर्यण्त ते सिद्ध करण्याकरिता रा. ब. नीं ज्या डावपेचांची योजना केली आहे ते सर्व उजेडात आणणें आमचे कर्तव्य आहे.

रा. ब. चें म्हणणें असें आहे की, स्मृतिग्रंथाचा जो आजार्यंत विचार झाला तो पायाशुद्ध झाला नाही. हे ग्रंथ लावण्याची एक पद्धत किवा सरणी आहे. त्याप्रमाणें जर या ग्रंथाचा विचार केला तर, धर्मशास्त्रात व्यभिचार अधिवेदन वगैरे यास जें शासन सांगितलें आहे त्यावरून व इतर वचनावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. (१) साधारण रीतीने व्यवहारात आजमितीस स्त्रियास जितकें स्वातंत्र्य आहे असे आपण समजतो त्यापेक्षा पूर्वी फारच जास्त असे. (२)नव-याजवळ राहण्यास बायको नाकबूल असल्यास तीस जुन्या ग्रंथात कैदेची तर राहूं द्याच, पण दुसरीही काहीं शिक्षा सागितली नाहीं. रा. ब. चे हे दोन्ही सिद्धान्त किंतपत खरे आहेत ह्याचा आज विचार कर्तव्य आहे, परंतु तो करण्यास लागण्यापूर्वी वाचकास येथे इतकेच सुचविणे अवश्य आहे की, खाली जें विवेचन केलें आहे ते फक्त एकाच दृष्टीने केलें आहे. म्हणजे हिंदुधर्मशास्त्र रा.ब. म्हणतात त्याचप्रमाणे आहे कीं नाहीं येवढाच काय तो आज आपणापुढें