पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रखमाबाईचा खटला ४१

शहाणपणचा किंवा कर्तव्याचा कोणताही भाग लोकाची चित्तें पुन: आपणांकडे वळविण्याकरितां शिल्लक ठेविला आहे असें नाहीं. तेव्हा आता पुनरपि तानीं आपली अधिकच बेअब्रू करून घेण्याचें नादी न लागता स्वस्थ रहावें हे बरें. हा आमचा उपदेश त्यांनीं मान्य न केल्यास त्यात हिंदुसमाजाचें काय नुकसान होणार ?

उर्पतितोपिहि चणक: |

शक्त: किं भ्राष्ट्रकं भक्तुम् ||

रखमाबाईचा खटला* मोठा मजकूर

महर्षि पिन्हेप्रणीत धर्मशास्त्रास गुंडाळून ठेवून हायकोर्टाने नुक्ताच या खटल्याचा जो निकाल केला तो ऐकून आमच्या स्त्रीसमाजसुधारणावाल्याची बरीच गडबड उडून गेली आहे, व अज्ञान आणि पराभवावेश याच्या भरात त्यांनी हवें तें बरळण्यास सुरवात केली आहे. एक म्हणतो:-"काय हो ! हायकोर्ट म्हणजे इंग्रजी न्यायाची आदिपीठ ! मग तेथे स्त्रियाच्या हक्काची अशी पायमल्ली व्हावीना ? हिंदु लॉ झाला म्हणून काय झाले ? हायकोर्टाने काही सुमार पाहावा कीं नाही ? आमच्या जुन्या कायद्याप्रमाणेच आमची व्यवस्था लावावयाची असल्यास आम्हास हें हायकोर्ट कशास पाहिजे ? एकट्या रखमाबाईस असल्या बेवकूब भ्रताराचे हातून सोडविल्याने हिंदुधर्मशास्त्रास काही बाध आला नसता. पण तेवढ्यानें रिफॉर्मचें काम किती पुढे सरले असते ?" दुसरे एक दिवाण हिंदु विधवाचे कनवाळू मलबारीशेट यास असें लिहितात की:- "या कलियुगाचा महिमाच असा की, न्यायाधिशानी असे न्याय द्यावे. रखमाबाईसारख्या साध्वीस तिच्या संमतीविरूद्ध या पुच्छविषाणहिनाच्या गळ्यात कोर्टानें बाधावीना ? हरहर केवढा अनर्थ हा ! पूर्वी येशूख्रिस्तास विनाकारण सुळावर चढवून आपल्या कपाळीं दुर्भाग्य ओढून आणल्याची यहुदी लोकाची एक गोष्ट आहे. पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार हा ! अहो ! हे आमचे पाप रखमाबाईस भोंवते आहे ! आम्ही आमचे ऋषिप्रणीत धर्म सोडले त्याचें हे फळ बरे ! धन्य रखमाबाई तुझी ! धन्य कीं लोकांच्या पापवादास न भितां तूं आपल्या पूर्वजास तारलेस व आपल्या देशभगिनींस कित्ता घालून दिलास !" तिसरे एक उंटावरील असें विचारतात की, "रखमाबाईचा विवाहसंस्कार झाला असला म्हणून काय झाले ? गर्भाधानसंस्कार कोठें झाला होता ? गर्भाधानसंस्काराखेरीज विवाहविधि पूर्ण होत नाहीं, निदान का व्हावा हे समजत नाहीं. इंग्रजसरकारचे हातून या गोष्टीचा जर


ता. २२ मार्च सन १८८७