पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

===== आधि कोण? राजकिय की सामाजिक? ===== ३३

येथे पुनरुक्ति केली पाहिजे असे नाही. त्यांच्या आंगचे हे गुण सर्वत्र प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे भाषण जिभेला जसे द्राक्ष् तसे कानाला लागते ! ते ऐकताना मंजुळ शब्द करीत वहाणाऱ्या स्वच्छ जलप्रवाहाची आठवण होते! त्यांच्या प्रतिपक्ष्यांना सुध्दा त्यांचे बोलणे लक्ष् देऊन ऐकावेसे वाटतें. सोमवारच्या व्याख्यानांत हे गुण विशेष प्रतिबिंबित झाले होते असे ज्यांनी खुद्द ऐकिले आहे त्यांचे मत आहे. हे समग्र व्याख्यान टाइम्सपत्रात प्रसिध्द झाले आहे. त्याने त्यांतील अगदिं बारीक खिळ्यांचे तीन कॉलम भरुन गेले आहेत. त्यांतील रस माराठी वाचकांस उतरुन द्द्यावयाचा म्हटले तर साऱ्याचे यथास्थित भाषांतर केले पाहिजे. ते करीत बसलो तर दोनचार आठवडे दुसऱ्या मजकुरास निरोप द्यावा लागणार! बरे इतके करुनही त्यांच्या श्रोत्यांस जे समाधान व जो आनंद ते ऐकल्यापासून वाटला असेल त्याच्या निम्मा भाषांतर वाचण्याने आमच्या वाचकांस होईल् किंवा नाही याचा संशय आहे. शिवाय त्या व्याख्यानात इंग्ल्ंडच्या इतिहासातील कित्येक महत्वाच्या गोष्टींचा व कायद्याचा जो उल्लेख् केला आहे तो आमच्या इंग्रजी न जाणणाऱ्या वाचकास सुबोध होण्याची पंचाईत आहे. सबब त्या व्याख्यानाचे निरस तात्पर्य देण्याशिवाय दुसरा इलाज नाही. आज येवढे करुन पुढच्या खेपेस आम्हास जे त्याच्यासंब्ंधाने म्हणावयाचे आहे ते म्हणू. मि. तेलंग म्हणाले:- ज्यांची गृहस्थिति सुधारली नाही त्यांची राजकीय स्थिती सुधारावयाची नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्याचा असा भाव आहे काय की अमुक प्रकारची देशांतील लोकांची गृहस्थिति असली म्हणजे अमुक प्रकारची संतोष मानण्यासारखी राजकीय सुधारणा व्हावयाचीच नाही, किंवा अमुक प्राकारच्या गृहस्थितीत् लोकांचे पाउल राजकीय कामात पुढे पडायचेच नाही असा जर त्याचा भाव असेल तर तो मोठ्या चुकीचा आहे. कारण एक तर गृहसुधारणा आणि राजकीय सुधारणा यांचे फारकत कोठे होते हे दाखविणे अत्यंत् दुरापास्त आहे. कोळ्याच्या जाळ्या प्रमाणे याच्या पदरांची एकांतएक इतकी गुंतागुंत होउन गेलेली आहे की, दिसण्यात जरी ते दोन प्रकारचे धागे दिसतात तरी उलगडायलाच बसले तर त्याच्यातील भेद दाखविण्याची मुष्कील पडेल. लोकशिक्षण, समुद्रपर्यटण, शिशुपरिणय, या पैकी कोणत्याही विषयाला शुध्द सामाजिक किंवा शुध्द राजकीय म्हणता येणार नाही. तथापि वादासाठी सामाजिक आणि राजकीय हा समंजस भेद आहे असे मानिले तरी तेवढ्याने सामाजिक अथवा गृहसंबंधी सुधारणा झाल्याखेरीज राजकीय सुधारणा व्हावयाची नाही, व ती करण्याचा प्रयत्न करु नये असे कशावरुन सिद्ध होते? बरे? हाही सिध्दांत खरा आहे असे घेउन चालले तरी हिंदू लोकांची कुटुंबे गुलामवाडे आहेत असे सिद्ध करण्यास काय आधार आहे? जुलूम करणारे जाणूनबुजून जुलूम करीत असले, व ज्यांच्यावर तो होत असला, व ज्याच्यावर तो होत असेल त्यांना तो आपणावर होत् आहे असे वाटत असले तर एकाला जुलमी