पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ लो. टिळकांचे केसरीतील लेख

          आधी कोण्? राजकीय की सामाजिक्?*
  गेल्या सोमवारीं मुंबई येथील 'स्डुड्ंट्स लिटररी अॅंड सायन्टिफिक सोसायटी' पुढे ऑनरेबल का. त्रिं. तेलंग यांनी "राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी" या विषयावर व्याख्यान दिले. हा विषय आमच्या कानांत दुमदुमू लागल्यास बरेच दिवस झाले. ज्या इंग्रज लोकांस आमची राजकीय धडपड रुचत नाही; त्यांचा आम्हास नेहमी उपदेश चाललेला असतो की, "आर्यलोकाग्रणीनो, राजकीय प्रकरणांत इतक्यांत तुम्ही पडूं नका, अगोदर आपली गृहस्थिति सुधारा, आमच्यापाशी राजकीय हक्कांसाठी मागणे घालण्यापूर्वी आपल्या बायकांस, आपल्या मुलींस, आपल्या बहिणीस गृहदास्यांतून सोडवा, ब्राम्हणक्षत्रियादि जातिभेद लयास न्या, स्त्रीशिक्षणाचा परिपाठ घाला, गतभर्तुकांच्या पुनर्विवाहास यथेच्छ संमति द्या, एकवीस बावीस वर्षेपर्यंत मुली अविवाहित ठेवून त्यांच्याकडून पितृगृहीं असतां विद्याभ्यास करावा, इ. इ. हे जोपर्यंत तुमच्यानें झाले नाहीं तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य भोगण्यास तुम्ही पात्र झाला असे होणार नही. दाराच्या आत तुम्हाला बादशाही अम्मल गाजवायला पाहिजे व दाराच्या बाहेर जिकडे तिकडे लोकसत्ता झळकली पाहिजे. ही असंभवनिय गोष्ट कधीही होणार नाही. तर तुमच्या हिंमतीचा ओघ प्रथम गृहसुधारणेकडे लागूं द्या." क्षुद्रदृष्टि इंग्रजांनी आम्हांस असा उपदेश करावा हें त्याना योग्यच आहे. आम्ही मात्र तो कितपत अनुसरावा हे विचारणीय आहे. मि. मलबारी यांनी शिशुपरिणय व असंमतवैधव्य या दोन विषयांवर आपल्या टांकानें आणि ओठानें हुल्लड करुन देण्यास आरंभ केल्यापासून या विषयाकडे बऱ्याच लोकांचे चित्त वेधले आहे. वर दिलेला मायावी उपदेश आमचे नानाफडणीस सर आक्ल्ंड कालव्हिन यांनी मि. मलबारी याच्या टिपण्णास उत्तर देतांना केला. काल्व्हिनसाहेब जाड बुडाचे ढेल पडल्यामुळे त्यांच्या लेखावर नेटिव्ह प्रेसाकडुन बरीच टीका झाली. पण या पंधरवड्यात या वादाने पुन: उचल खाण्यास मि. वर्ड्सवर्थ् यांनी मि. मलबारीस धाडिलेले पत्र कारणीभूत झाले! त्यांनी त्या पत्रांत आम्हास वरील प्रकारचा उपदेश करणाऱ्या इंग्रजांची खाशी खरड काढून टाकिली आहे, व विषेशत: पाद्री लोकांवर चांगलाच चाबूक ओढीला आहे! त्यांच्या पत्रांतील मुख्य आशय असा अहे की, सामाजिक सुधारणेसाठीं अगदी जीव सोडण्याची गरज नाही; राजकीय सुधारणा होत चालली म्हणजे तिच्या कधी बरोबर, कधी किंचित पाठीमागून, सामाजिक सुधारणा होत जाते. हाच सिध्दान्त काशिनाथपंतांनी आपल्या व्याख्यानांत विशेष खुलाश्याने सिद्ध करुन दाखविला आहे. काशिनाथपंतांची वाकशैली, विचारसरणी, कोटिक्रम, वाचनव्याप्ति व विनय- या विषयीं

  • (वर्ष ६ अंक ९, १० सन १८८६)