पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० लो. टिळकांचे केसरींतील लेख

खरी कीं, ज्या देशांत सुधारणा जागृत असते, तेथल्या रीतीभातींतही पण कांहीं जोम असतो; करितां एखाद्या देशाचाराचें सुधारणेस अनुकूल व शुद्ध असे स्वरूप पाहणें असल्यास, त्या बाबतीत ज्या देशात सुधारण चालू आहे तेथें कसा काय प्रघात आहे तो अवश्य पाहिला पाहिजे. प्रस्तुत ज्या देशात सुधारणा जागृत आहे असे देश म्हटले म्हणजे, युरोपांतील इंग्लंडादि व अमेरिकेतील युनायटेडस्टेटस् आदि करून होत.व या सर्व देशाच्या सुधारणेचा मूळ पाया रोमन व ग्रीक लोकांची सुधारणा होय. युरोपातील हल्लीचीं बहुतेक राष्ट्रे रोमन व ग्रीक लोकांच्या मोडक्या इमारतीच्या पायावरच उभारलीं आहेत. म्हणून जर त्या राष्ट्रात एखाद्या बाबतीत कसा काय रिवाज आहे, हें पहावयाचें असेल्, तर त्यापूर्वी रोमन व ग्रीक लोकात त्या संबंधें कशी काय वहिवाट होती हे पाहिलें पाहिजे म्हणजे त्याची उपपत्ति चागली कळून येईल; याकरिता दत्तकाच्या संबंधाने तिथीपासून सुरवात करू.

        प्राचीन सुधारलेल्या राष्ट्रांपैकीं मुख्य मुख्य राष्ट्रे म्हटलीं म्हणजे एशिया खंडांतील हिंदुस्थान, चीन वगैरे देश, व युरोपांतील रोम व ग्रीस हीं होत. व त्यांतही पहिली सुधारणा म्हणजे एशिया खंडातलीच. तथापि या दोनही खंडांतल्या सुधारणेत एक मोठे अंतर आहे ते हें की, आम्ही व आमचे सर्वभक्षक बंधू चिनी लोक, यानी परंपरागत आलेली सुधारणा पुढे चालविण्याचा प्रयत्न केला नाहीं, आणि रोमन व ग्रीक सुधारणेची तशी व्यवस्था न  होता, स्वदेशांत नाही, तर परदेशांत तरी तिला पुरस्कर्ते मिळून तिची वाढ कायम राहिली आहे. एवढ्याच कारणाने जरी या दोनही सुधारणाचे पुर्वरूप बहुधा सारखें आहे, तरी शेवटीं शेवटीं दोहोंत पुष्कळच फरक नजरेस येतो. उदाहरणार्थ, दत्तकच घ्या. या संबंधाने एशियाखंडातील व युरोपखंडातील सुधारलेल्या प्राचीन राष्ट्रातल रिवाज अगदी सारखा होता, असें म्हटल्यास हरकत नाहीं. इतकेंच नव्हे, तर कित्येकास हा प्रघात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला कीं काय, अशीही शंका आहे. पण शेवटील प्रकार पाहावा तो अगदीच निराळा. आम्ही अजून जशाचे तसेंच "माता  पिता वा दद्याता" घाटीत बसलों आहों, व आमचे पाश्चिमात्य बंधु झपाट्याने पुढे चालले आहेत. दत्तकाच्या संबंधानें आज जी माहिती उपलब्ध आहे, तीवरून असे दिसून येते कीं, पूर्वी हा प्रघात सार्वत्रिक होता. आमच्याप्रमाणे रोमन, ग्रीक व चिनी लोकात पितराच्या ऋणाचें महत्त्व मानिले आहे व आमच्यामध्यें जसें कुलाचारांचें प्राधान्य आहे, तसेच इतर राष्ट्रातही एकदां होते. ग्रीस देशचे इतिहासकार मि. ग्रोट यांनीं असें लिहिलें आहे कीं, त्या देशांत पूर्वी प्रत्येक घराण्याचा कुलाचार निरनिराळा असे, व त्या कुलातील होमहवन किंवा श्राद्धादिक करण्यांस कुलांतल्या पुरुषाखेरीज कोणासही अधिकार नव्ह्ता, चिनी लोकांत हाच प्रकार आहे असें म्हणतात. रोमन लोकांत आमच्याप्रमाणेंच पूर्वी दत्तक देणाराचा एकटाच मुलगा असल्यास घेत नसत;