पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ लो. टिळकांचे केसरींतींल लेख

करणार नाहीं, तितका हक्क कायम राखून द्रव्याची लोकांत सारखे वांटणी करतां येईल किंवा एकाचा द्रव्यसंचय सर्वत्रांच्या ऊपयोगास लावतां येईल, तेव्हां तेव्हां आपणांस त्या प्रसंगाचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे. दत्तक घेण्याचा काळ हा अशाच प्रसंगातील मुख्य प्रसंग म्हटला तरी चालेल. दत्तक होणाराचा त्या द्रव्यावर काहीं हक्क नसतो, व दत्तक घेणारास वास्तविक रीतीनें पाहिलें म्हणजे दत्तकास तें द्रव्य देण्याचा अधिकार असूं नये. लोकास ही गोष्ट कळू लागून लोकमतांत थोडासा फेर झाला, म्हणजे स्वार्जितावर अधिकार दिल्यानें समाजांत जे दोष उत्पन्न होतात, ते थोडेबहुत तरी निवारण्याचा आपणास एक चागला मार्ग सापडेल. दत्तकाचा प्रघात पडल्यानें आज लाखों रूपये लोकोपयोगाकडे न लागतां, श्रम केल्यावांचून कांही लोक त्यांचा यथेच्छ उपभोग घेत आहेत. यांत समाजाचें किती नुकसान होंतें, याची वाचकांनींच कल्पना करावी. सारांश, अर्थशास्त्रदृष्ट्या पाहिलें तर दत्तकाचा प्रघात आमच्यांत चालूं असल्यामुळें, व्यवहारांत आमच्या लोकांचे पुष्कळ नुकसान होऊन, स्वार्जितावर अधिकार दिल्यापासून समाजांत जो भेद होतो, तो मोडून टाकण्याची अमोलिक संधि ही आज आपण गमावीत आहों. मग यापुढें आमचे डोळे कधीं उघडतील ते उघडोत !

 शेवटी वरील सिद्धातास एक दोन ठळक अपवाद आहेत, ते सांगून आजचा लेख संपवितों. अर्थशास्त्ररीत्या दत्तकाची चाल अग्राह्य का आहे, हें वर सागितलेंच आहे. तेव्हा वरील नियमास अपवाद म्हटले म्हणजे, जेथें तें कारण लागू पडत नाहीं ते होत. पैकीं पहिला व मुख्य अपवाद ज्या इस्टेटीस कांहीं कामगिरी जोडली असते, त्यांसंबंधीं होय. यांत पाटिलकीपासून राज्यापर्यंत सर्वांचा समावेश होतो. तशा इस्टेटीचा मालक औरस संततीवांचून मयत झाला असता, त्याच्या पाठीमागें त्याची कामगिरी बजावण्यास कोणीतरी मनुष्य पाहिजेच. वस्तुत: पाहतां, सदर इस्टेटीस स्वार्जित न म्हणतां, कांहीं विशेष कामाबद्दल वेतन म्हटलें असतां चालेल. ह्या वेतनावर कोणाचाही स्वार्जिताप्रमाणें हक्क पोंचत नाहीं. जो काम करीत असतो, त्यासच तें मिळेल. व काम बंद पडणें इष्ट नसल्यास, तें वेतन तसेंच सुरू ठेविलें पाहिजे. कोणताही राजा निपुत्रिक मेला असतां, त्याची गादी चालविण्यास कोणी नसल्यास,त्यांत लोकांचे नुकसानच आहे. करिता अशा ठिकाणीं दत्तक घेण्यास कांहीं हरकत नाहीं; तथापि औरस संततीच्या अभावीं कोणास दत्तक घ्यावा, किंवा निदानपक्षीं वाईट मनुष्य तरी दत्तक घेऊं नये, हे पहाणें लोकांकडे असावें. 
   दुसरा अपवाद मिल्ल साहेबांनी प्रस्तुत विषयासारखाच एक विषय प्रतिपादन करीत असतां, आपल्या अर्थशास्त्रावरील पुस्तकांत दिला आहे. तो असा कीं, जर मयत मनुष्याचा एखादा मोठा कारखाना असला, तर तो मोडून टाकून त्याचे पैसे करून लोकोपयोगाकडे लावण्यापेक्षां, तो एकास देण्यांतच लोकांचा विशेष फायदा आहे; करितां अशा वेळीं एकासच इस्टेट दिल्यानें, लोकांचे कांहीं नुकसान