पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २७

कल्याणाकरितां अहे असे समजावयाचे व त्याचें खरोखर कामही हेंच आहे.) लोकोपयोगाकडॅ लागेल. जमिनींत सांपडलेल्या द्रव्याची जर ही गोष्ट तर दत्तक होऊन एखाद्याची इस्टेट घेणारासच निराळा नियम का असावा ? कोणी असें म्हणतील कीं या दोन गोष्टी अगदीं भिन्न आहेत, कारण दत्तकास जी इस्टेट मिळते ती पूर्वीच्या मालकांच्या अनुमतीनेंच मिळतें व त्याबद्दल त्यास मृताचे श्राद्धादिक करावें लागतें. परंतु तसा प्रकार जमिनींत सांपडलेल्या द्रव्याचा नाहीं. गोष्ट खरी आहे, पण त्यात प्रश्न म्हणून येवढाच कीं मालकास, अशा रीतीनें वाटेल त्यास विनाकारण आपली इस्टेट देण्याचा अधिकार कोठून आला ? एखाद्या वस्तूवर आपला हक्क काहीं नैसर्गिक नाहीं, म्हणजे एखादीं वस्तु आपणास प्रयत्नानें मिळाली तेवढ्यानेच त्या वस्तूवर आपला हक्क येत नाही. श्रम, बुद्धि मितव्यय हीं जरी द्रव्यसंचयाची कारणें आहेत तरी त्यापासून हक्काची उत्पत्ति होत नाहीं. केवळ मी मिळविलें म्हणूनच माझा त्यावर हक्क नाही, तर लोकांनी तो हक्क कबूल केल्यामुळें तो मला प्राप्त झाला आहे, ही गोष्ट नेहमीं लक्षात ठेविली पाहिजे. अर्जन व अधिकार याचा कार्यकारणभाव स्वभावसिद्ध नसून, तो लोकांनी कबूल केल्याखेरीज होणें अशक्य आहे. ही लोकाची कबुली किंवा अनुमोदन दोन प्रकारें व्यक्त होत असतें. एक कायद्यानें व दुसरे लोकमताने. कारण सर्वत्र गोष्टीचें कायद्यानें नियमन करता येत नाही. जेथे जेथे कायदा अपुरा पडतो, तेथें तेथें लोकभय भर घालते. स्वकष्टार्जित द्रव्याचा हवा तसा व्यय करण्यास जरी कायद्यानें प्रत्येक मनुष्यास अधिकार दिला आहे, तरी मागे लिहिल्याप्रमाणें आपलें द्रव्य दुर्व्यसमात उडविण्यास लोक का भितात ? लोकभयाने. मग हेंच लोकभय दत्तक घेण्यास का उपयोगी पडू नये? समाजरचनेच्या नियमाच्या आमच्या अज्ञानाखेरीज आम्हास तर दुसरे काहीं कारण दिसत नाही. स्वार्जितावर पूर्ण हक्क दिल्यानें जसा दुर्व्यसनात व समुद्रांत पैसे उडविण्याचा व टाकण्याचा कोणास हक्क येत नाहीं, तशीच मरतेवेळीं एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतही त्यास देता येणार नाहीं. दोनही प्रकार सारखेच निद्य आहेत. भेद इतकाच कीं, एक आपण मानीत आलों, व दुसरा तसा मानण्यास अजून शिकलों नाहीं. औरस पुत्रादिकास आपली इस्टेट का द्यावी, हें मागें सांगितलेंच आहे; ती दत्तकास देण्यास तशा त-हेचे काही कारण नसते. त्यानें श्राद्धादिक करावें, याकरितां देतों म्हणून कोणी म्हणतील, तर एकतर हें पोकळ कारण आहे, हें मागें सिद्ध केलेंचे आहे; व दुसरें तेवढ्याकरिता कांही सगळी इस्टेट दत्तकास द्यावयास नको. स्वार्जितावर पूर्ण अधिकार दिल्यानें आधीच समाजांत द्रव्याचा विषम विभाग होत आहे. पण जरी कसा तरी द्रव्यसंचय व्हावा, येवढ्याकरिता समाजाने तो कबूल केला आहे, तरी द्रव्याची वांटणी समाजात सारखी होऊन सर्वत्रास सारखे सुख व्हावें, हा आपला इष्ट हेतु असल्यामुळें जेव्हां जेव्हां स्वार्जितावर जितका हक्क दिल्याखेरीज द्रव्यसंचय कोणी