पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २३

व्यवहाराची कांही एक नड नसतां, ज्या मनुष्यास ती मिळण्याचे आशा नाहीं, अशा मनुष्यास देण्यानें, ज्या समाजाचे योगानें आपणांस द्रव्यसंचय करतां आला, त्याचें आपण काहींच नुकसान करीत नाहीं काय ? स्वकष्टार्जित द्रव्याचा जन्मभर यथास्थित उपयोग करून घेतल्यावर, मरणसमयीं विनाकारण समाजापैकीं एकाच मनुष्यास ते देण्याचा आपणांस कोठून अधिकार आला? आपल्या पाठीमागें आपल्या द्रव्यावर कोणाचाच विशेष हक्क नसल्यास, द्रव्यानें साध्य जी सुखप्राप्ति, ती जितकी जास्त होईल, तितकी आपणास केली पाहिजे. आपणाजवळ पुष्कळ द्रव्य असल्यास तितकें सगळें पुत्रास द्यावें कीं नाही, याचाही विचारच आहे. तथापि ते तूर्त बाजूस ठेविलें, तरी दत्तक घेऊन त्यास आपली इस्टेट देण्यास उपयुक्ततेच्या, धर्माच्या किंवा व्यवहाराच्या दृष्टीनें कांहीच प्रमाण सापडत नाही. ज्या लोकात दत्तकाचा प्रघात नाहीं, त्यांत अशी काय व्यवस्था करितात, वगैरे गोष्टी आज सांगावयाच्या होत्या, परंतु लेख लावल्यामुळे त्या पुढील खेपेवर सोपवितो.


(५)

     अर्थशास्तदृष्ट्या प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वकष्टार्जित द्रव्यावरही, आम्ही सामान्यत: मानतो त्यापेक्षा फारच कमी हक्क आहे. द्रव्यसंचय हा सुखप्राप्तीसाठी असल्यामुळें, तो एका व्यक्तीनें केला असो, किंवा समाजाने केला असो, त्याचा योग्य कामी व्यय व्हावा, यातच व्यक्तीचें व समाजाचें हित आहे. "वसुधैव कुटुंबकम्" या उदार दृष्टीने पाहिले असता, समाजाची अति उत्कर्षावस्था म्हटली म्हणजे व्यक्तिमात्रास सारखे काम व सारखें सुख असावे, ही होय. व असें होण्यास सुखप्रातीचे साधन जे द्रव्य तें समाजात एक तर सारखें वाटून गेलें पाहिजे, किंवा एकत्र असल्यास समाजाच्या समायिक ताब्यात असावें. ए-हवी सर्वांस सारखें सुख कधींच प्राप्त होणार नाहीं. वरील विचार मनांत येऊनच कांही इग्रजी व फ्रेंच अर्थशास्त्रवेत्त्यानीं समाजार द्रव्यसंचयाची अविभक्तावस्था पसंत करून, त्याप्रमाणें समाजरचनेत फेरफार करण्याबद्दल शिफारस केली आहे. त्याच्या मतें समाजातील सर्व मनुष्यांनी एका अविभक्त कुटुंबाप्रमाणे राहून आपल्या योग्यतेप्रमाणें सारखें काम करावें, व त्यापासून होणारा जो द्रव्यसंचय तो सर्वांची सामयिक प्राप्ति समजून सर्वत्रांस सारखें सुख प्राप्त होईल अशी तजवीज ठेवावी. एकीकडे समाजांतील हजारों लोकांस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाडकष्ट करून पोटभर भाकर देखील मिळत नाहीं, व दुसरीकडे आजापणजांनीं तरवार गाजवून हजारों लोकास यमलोक दाखविला, म्हणून काहीं लोकांस कवडीचाही श्रम न करितां, सगळ्या आयुष्यभर चैन भोगण्यास सांपडते, हे मनात आलें म्हणजे वरील अर्थशास्त्रज्ञ ऋषींच्या वचनास मान डोलावल्याखेरीज राहवत नाहीं. रथापि समाजाचा पूर्वीचा इतिहास, व मनुष्याच्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ति, हीं मनांत आली म्हणजें ही सत्ययुगांतील स्थिति आपणांस कधीं तरी लाभेल किंवा नाही, याचाच विचार पडतो. कुटुंबांतील किंवा