पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २१


नये. पण थोडा विचार केला असतां वरील दोन कल्पनांची जी सांगड घालून दिली आहे, तींत कितपत तथ्यांश आहे हें तेव्हांच लक्षांत येंण्याजोगें आहे. वरील प्रमेयात मुख्य चूक म्हटली, म्हणजे मनुष्याच्या व्यवहारास कायद्याखेरीज दुसरें बंधन नाहीं, असें मानणें ही होय. वस्तुत: पाहतां कायद्याचे बंधन अगदीं अपुरतें आहे, व त्यास जर इतर बंधनांचें साहाय्य नसतें तर आपले सामाजिक व्यवहार हल्लीं चालले आहेत, तसे सुरळीत चालले नसते. असें पहा कीं कोणींही मनुष्याने आपला पैसा रंडीबाजींत किंवा दारूबाजींत उडवूं नये, असा कोठेंही कायदा असल्याचें ऐकिवांत नाहीं, व कायदेशीर रीतीनें पाहतां प्रत्येक मनुष्यास आपला पैसा या दुर्व्यसनांत घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. तथापि तेवढ्यावरून ती गोष्ट निंद्य नाहीं, असें कोणीही मनुष्य म्हणणार नाहीं, व एखाद्यानें सभेंत किंवा वर्तमानपत्रांत या विषयाची चर्चा केल्यास तीही अप्रयोजक म्हणता येणार नाहीं. कायद्याचा उद्देश एवढाच असतो, कीं कोणाहे मनुष्यानें दुस-याचे हक्कास प्रतिबंधक अशी गोष्ट करूं नये. यापेक्षा जास्त नियम कायद्यांत घालतां येत नाहींत. तथापि इतर व्यवहारात मुळींच नियम नाहींत असें समजूं नये. महाभारतात एके ठिकाणी म्हटलें आहे:--

    यमदंडभयात्केचित्पापा: पापं न कुर्वते राजदंडभयात्केचित्परस्परभयदिप ||
           म्हणजे कांहें गोष्टी धर्माच्या भीतीनें, कांही कायद्याच्या भीतीनें व कांहीं लोकभीतीस्तव आपण करीत नाहीं. सकाळीं स्नान करावें, चांगले अन्न खावें, दुर्व्यसनात पैशाचा अपव्यय करूं नये, वगैरे गोष्टींत नियामक लोकलज्जाच होय्. लोकात एखादीं गोष्ट वाईट मानली गेली, म्हणजें कयद्याने जरी ती गोष्ट करण्यास परवानगी असली, तरी ती करण्यास कोणीही धजावन नाहीं. इतकें 'परस्परभय' (लोकलज्जा किंवा अब्रू) याचे बंधन असतें. म्हणून कोणतीही चाल प्रचारात आणण्यापूर्वी, किंवा त्यासंबंधानें कायदा करण्यापूर्वी, लोकमत फिरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कायदा हा लोकमताचा पूरक असल्याकारणाने, जर त्यास लोकमताचें पाठबळ नसेल, तर त्याचा कांहीं एक उपयोग होत नाहीं, व हाच सर्वसाधारण सिद्धान्त दत्तकासही लागू आहे.जोपर्यंत दत्तक घेतल्यानें मनुष्य आपल्या द्रव्याचा दुरुपयोग करतो, असा लोकांचा समज झाला नाहीं, तोंपर्यंत ही चाल कधींही बंद पडणार नाहीं. कायदेशीर रीतीनें मनुष्यास आपलें द्रव्य कोणासही देण्याचा अधिकार असो, तथापि जर तो मनुष्य आपल्या द्रवयाचा दुरूपयोग करील तर 'परस्परभया'ने असा प्रकार बंद करण्याचा लोकांस पूर्ण अधिकार आहे व तो अधिकार 'दारूबाजी'.'रंडीबाजी' वगैरे गोष्टींत आपण प्रत्यहीं बजावीत आहो. कायद्याच्या दृष्टीनें पाहिलें, तर कोणाही मनुष्यास आपलें द्रव्य समुद्रांत टाकण्यास कांही प्रत्यवाय नाहीं, मग तसें लोक कां करीत नाहींत? उघडच आहे कीं, ह्यास लोक पैशाचा दुरूपयोग समजतात व एखादे राजेश्री जर घरांतील सर्व इस्टेट