पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० लो. टिळकांचे केसरींतील लेख

    सारांश, प्रेमाकरितां कोणीही प्रथमत: दत्तक घेत नाहींत. आतां ज्याप्रेमाणें औरस पुत्र असतां, तुम्ही 'नांव चालविण्याचे' मागील अंकी सांगितलेले उपाय करा असें कोणी म्हणत नाही, त्याचप्रमाणें एखाद्या मनुष्यास तसा पुत्र नसता, जर त्याचें प्रेम एखाद्या मुलावर जडून तो त्याच्या हाताखालीं लहानपणापासून वाढला असला, त्या दोघाचे अगदीं ऐक्य बनून गेलें असलें, तर अशास दत्तक घेऊं नये हें म्हणणेंही रास्त होणार नाहीं. त्याची सोय त्या मनुष्यानें केलीच पाहिजे. परंतु मरेपर्यंत मुलगा होण्याची वाट पाहून, मरणसमयीं गतानुगतिकन्यायाने त्यानें किंवा पुढें त्याच्या पत्नींने आपलें घरदार एखाद्या पोराच्या स्वाधीन करणें, यास मूर्खपणाखेरीज काय म्हणावें, हें आम्हास समजत नाही. त्या पोराचा तरी त्या इस्टेटीवर काय हक्क? मालकाची इच्छा म्हणून कोणी म्हणेल तर त्यास समाजाचा असा प्रश्न आहे कीं, मालकानें तरी ती आपली म्हंणून हवीतशी उधळावी काय? प्रत्येक मनुष्याचे मालमत्तेवर आमचा कांहींच हक्क नसावा काय? असो; या प्रश्नाचीं उत्तरें आज देत बसल्यास आणखी दोन चार कॉलम लागतील, करितां तूर्त येथेंच मुकाम करितों.
           (४)                        

दत्तक घेण्यास व्यवहाररीत्या कोणत्याही त-हेची आवश्यकता नाही, असें जरी मानलें, तथापि त्यावर आणखी एक असा आक्षेप निघणार आहे कीं, ज्या अर्थी प्रत्येक मनुष्यास आपण संपादिलेल्या धनाचा वाटॅल तसा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, व तों तें वाटेल त्यास देऊं शकेल, त्याअर्थी त्या मनुष्याने दत्तक घेतला, असें मानण्यापेक्षां त्यानें आपली इस्टेट आपणांस वाटेल त्यास दिली, असें मानावें, म्हणजे दत्तकाची आवश्यकता आहे की नाहीं, ह प्रश्न मुळींच निष्पन्न होत नाहीं. दत्तक धर्मदृष्ट्या आवश्यक असो किंवा नसो, आम्ही आपल्या मालमिळकतीचा मालक त्यास करणार, व ज्यापेक्षां आमच्या द्रव्यावर आमचें पूर्ण स्वत्व आहे, त्यापेक्षां असें करण्यास आम्हांस दुस-या कोणत्याही कारणाची अपेक्षा नाही.

       वरील आक्षेपास उत्तर देण्यापूर्वी त्यातील प्रधान सिद्धान्ताची, म्हणजे आपण संपादिलेल्या द्रव्याची हवी तशी विल्हेवाट करण्याचा प्रत्येक मनुष्यास अधिकार आहे, या वाक्याची थोडी विशेष फोड करणें जरूर आहे 'अधिकार' किंवा 'हक्क' हे शब्द जरा संदिग्ध असल्यामुळें, त्याचा दुहेरी उपयोग होऊन वाक्यांत उत्पन्न झालेली संदिग्धता एकदम लक्षांत येत नाही. एखादी गोष्ट करण्याचा आपणास 'अधिकार' आहे असें म्हटलें, म्हणजे प्रथमत: अशी कल्पना मनांत येतें, कीं आपण ती गोष्ट करूं लागल्यास कायदेशीर रीतीनें आपणांस कोणच्यानेंही अटकाव करवणार नाहीं व ही कल्पना मनांत आली म्हंणजे सहजच त्याबरोबर दुसरीही अशी कल्पना मनात येतें, कीं जर ही गोष्ट करण्यास कायदेशीर हरकत नाहीं, तर मग दुसरी कोंणतीही हरकत राहिली नसून, ती गोष्ट करणें आपल्या खुशीवर आहे, व त्य संबंधाने आपणास कोणीं कांही बोलूं