पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ लो. टिळकांचे केसरींतील लेख

तशी आतां राहिली नाहीं, हें अगदी उघड आहे. शिवाजीचें स्मरण आपणांस राहाण्यास संभाजी कारण झाले काय? किंवा नाना फडणविसांच्या कुटुंबानें त्यांच्यामागें दत्तक घेतल्यामुळेंच त्यांचे नांव इतिहासांत आलें काय ? बडांतील नानाखेरीजकरून किती दत्तकांनी तरवार गाजविली आहे? लहानपणापासून एखाद्या मुलास आपल्या देखरेखीखाली ठेवून त्यांच्यांत आपल्या कुलाचा अभिमान, शौर्य वगैरे गुण दृष्टोत्त्पत्तीस घेऊं लागल्यावर, मग त्यास दत्तक घेतला असतां, तो दत्तक आपल्या घराण्याचें नांव काहीं तरी चालवील. पण असा दत्तक आपल्यापैकीं किती लोक घेतात ? आधीं मरेपर्यंत पुत्र होण्याची आशा सुटत नाही; बरें तितकेंही करून एखाद्यानें दत्तक घेण्याचें ठरविलें, तर आपल्या पाठीमागें दत्तक मुलगा आपल्या बायकोस कसें वागवील, याचे भीति मनांत उभी राहाते ! दत्तक घेणारा जिवंत असतांच दत्तक मुलाने इस्टेटीचा वाटा मागितल्याचीं उदाहरणें आपणास बरीच आढळतात. मग सपिंडी होण्यापूर्वीच आईचें व दत्तक मुलाचें जामदारखान्याच्या किल्ल्यासंबंधानें भाडण झाल्यास काय नवल ? बोलून-चालून बिछान्यावर मरण्यान्मुख पडलें असता, एखादा उपरी पोर धरून आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करून घेतल्याचे सुख मानून घ्यावयाचे ! मग अशा पोरानें आपलें नांव राखण्यापेक्षा बुडविल्यास आश्चर्य तें कोणतें ? नाव राखण्याचे दुसरे कांही मार्गच नव्हते, त्या वेळची गोष्ट निराळी होती. पण हल्ली आपलें नांव कायम ठेवण्यास वर सांगितलेले पुष्कळ मार्ग असतां, असल्या वेडगळ मार्गानें जाण्यांत अर्थ कोणता ? आपलें व आपल्या कुलाचें नाव व इस्टेट एखाद्या उपरी पोराच्या हवालीं करून, तो आपलें नांव राखील या आशेवर बसण्यापेक्षा, एखादें धर्मकृत्य करून तद्द्वारा आपलें नांव लोकात ठेवून, स्वार्थ व परमार्थ एकाच कामीं साधत असताही, केवळ गतानुगतिकन्याआनें आपण आपल्या नांवास व इस्टेटीस मुकत आहों, हें अगदीं स्वल्प विचारातींदेखील साधारण बुद्धीच्या मनुष्यास समजण्याजोगें आहे. तथापि पूर्वापार चालत आलेल्या चालीचा आपल्या मनावर एवढा बळकट ग्रह असतो, कीं आपणांस अगदी सामान्य गोष्टीदेखील दिसत नाहींत ! असो; लेख बराच लाबला, करितां दत्तकाचा प्रचार सोडून त्या ऐवजीं वर सागितलेले मार्ग प्रचारांत आल्यास देशाचें काय हित होईल याचा विचार पुढील खेपेस करूं. फार प्राचीन काळाप्रमाणे हल्ली नांव चालविण्यास दत्तकाची जरूर नाहीं, इतकें वरील विवेचनावरून सध्यां वाचकाच्या नजरेस आलें असता पुरें आहे.

                           (३)                                       
      कोणी असें म्हणतील कीं, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें स्वर्गप्राप्तीकरिता जरी दत्तकाची जरूर नाही असें मानिलें, आपली क्रिया आपण आटपून घेतली, व वंशाचें नांव चालविण्याकरिता इस्टेट धर्मादायास लावून दिली, तथापि पुत्रत्व म्हणून जें कांही आहे त्याची तृप्ति कशानें करावी ? प्रत्येक मनुष्याचें आपल्या