पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{संपादन सुरू आहे}

१६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

मनुष्याची संस्था नीट व्हावी, हे प्रत्येक धर्माचे बीज होय. मग आवडीच्या किंवा मताच्या वैचित्र्यामुळें त्यांत पाहिजे तेवढे प्रकार होवोत. धर्मग्रंथाचा मूळ हेतु हा असल्यामुळें, त्यातून मध्यें मध्यें इहलोकच्या सुखप्राप्तीबद्दल जे नियम दिले असत्तत, ते धर्माच्या प्रधान अंगांत गणितां येत नाहींत. व एकदां कोणतीही गोष्ट व्यावहारिक ठरली म्हणजे तिला धर्माच्या पांघरूणानें जी मतब्बरी प्राप्त होते, तीस ती मुकते, मग ती गोष्ट कितीही महत्त्वाची असो. परलोकांत आपल्यास 'रिझर्व' जागा मिळावी म्हणून इहलोकीं काहीं लोक आपल्या शरिराचे काय काय हाल करून घेतात, हें ज्यानें पाहिलें असेल, त्यास वरील वाक्यांचे यथार्थत्व बरोबर कळून येईल. धर्म व व्यवहार यांमध्यें इतका भेद स्वभावत:च असतो, व त्या दृष्टीने पाहिलें, तर दत्तक घेण्याचा पहिला हेतु धर्मरीत्या अनवश्यक ठरल्यावर नांव चालविण्याच्या दुस-या हेतूस महत्त्व देणें किंवा न देणें, हे प्रत्येकाच्या मर्जीवर आहे.धर्माज्ञेच्या बाहेर पडल्यावर, पिनल कोडाच्या हद्दींत येईपर्यंत, प्रत्येक मनुष्य अगदीं स्वतंत्र आहे व हल्लींच्या काळात समाजनियमाचे बंधन शिथिल झाल्यामुळें तर, ही स्वतंत्रता अलीकडे विशेष प्रबल, व कांहीं गोष्टींत तर अगदीं उच्छृखल झालेली नजरेस येते. पण आज त्या गोष्टींचा आपणांस विचार कर्तव्य नाहीं. सारांश, एखादी गोष्ट निव्वळ व्यावहरिक ठरली म्हणजे तिची आवश्यकता कमी होण्यास तेवढेच कारण बस्स होतें, व हाच नियम वरील दत्तकाच्या हेतूसही लागू आहे. "नामसंकीर्तन" (नांव चालविणें) ही एक धर्मांतील बाब नसल्यामुळेंच तिचें आवश्यकत्व प्रथमत: कमी झाले; व त्यांत काही हशील आहे, असें ज्यास वाटत असेल, त्याखेरीज दुसरा कोणताही मनुष्य तेवढ्याच कारणाने दत्तक घेण्यास राजी होणार नाही. करिता मनूने सागितलेल्या वरील व्यावहारिक हेतूंस कांही हशील आहे कीं काय, याचा विचार करूं.

         आतां पहिल्यानें येवढी गोष्ट कबूल केली पाहिजे कीं, आपले नाव आपल्या पाठीमागें चिरकाल रहावें अशी प्रत्येक मनुष्यास अगदीं स्वभावत:च इच्छा असते. एका इंग्रजी ग्रंथकारानें तर वरील इच्छेची व अमरत्वाची सांगड घालून दिली आहे, व याज्ञवल्क्यस्मृतीत वरील मनुस्मृतीतल्या श्लोकांच्या अर्थाचा जो श्लोक आहे, त्यातीलही आशय त्याचप्रमाणे आहे. "लोकानंत्यं दिव: प्राप्ति: पुत्रपौत्रप्रपौत्रकै:" म्हणजे मुलगा, नातु, व पणतू यांनी इहलोकीं आनंत्यं (निरंतर नांव राहाणें) व स्वर्गप्राप्ति होते असें त्या स्मृतींत वाक्य आहे. सर्व मनुष्यें जर अमर असती, तर पुत्राची जरूर कोंणास कदाचित वाटली नसती.पण मृत्यु हा सर्वांस साधारण असून, आपणांस हें जग कधींना कधीं तरी सोडून गेलें पाहिजे, तेव्हां शरीर, रूप, बांधा व बुद्धि यांत अगदीं आपणासारखा (बहुतेक मुलगे वरील गोष्टींत आपल्या वडिलांप्रमाणेंच असतात.) असा एक पुत्ररूप आपला प्रतिनिधि जगांत ठेवून त्याच्या द्वारें आपले स्मरण जगांत