पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता १५

विधानही आपत्कालींचे सांगितले आहे. +एतावता निष्पन्न काय होते कीं, औरस पुत्र नसल्यास स्वर्गप्राप्तीसाठीं दत्तकपुत्र घेण्याची जरूर नाहीं. तें काम पुष्कळ इतर उपायांनीं होंण्याजोगें आहे. मग आपल्यास आपल्या (दत्तक) पुत्राकडूनच स्वर्गप्राप्ति झाली पाहिजे, या आग्रहास दुराग्रहापेक्षा दुसरें काहीं म्हणता येणार नाहीं. दत्तकावरील ग्रंथकाराचेंही मत त्याचप्रमाणे आहे. दत्तकमंजरीकारानीं तर 'पुत्रप्रतिनिधि: काम्य एव' म्हणजे दत्तक वस्तुत: अनवश्यक आहे, असा स्पष्ट शास्त्रार्थ दिला आहे.अमुक एक मनुष्याचे हातूनच मला स्वर्गप्राप्ति झाली पाहिजे, याखेरीज यांत कांही मतलब नाही, असेही आणखी त्यानीं सागितले आहे. साराश, शास्त्रदृष्ट्या स्वर्गप्राप्तीस दत्तकाची मुळींच जरूर नाहीं, मग दुराग्रह व रुढि काय म्हणतील तें म्हणोत.


धर्मसंबंधी दुसरा मुद्दा पिडोदकदानाचा. याही संबंधे आमचें आमचें मत वरीलप्रमाणेंच आहे. आधीं स्वर्गप्राप्ति झाल्यावर श्राद्धादिकाची जरूरच नाहीं, तथापि मुलगा नसल्यास, भाऊ, पुतणे, बायको इतर आप्त वगैरे पुष्कळ श्राद्धाधिकारी सागितले आहेत, व दत्तक न घेतल्यानें म्हणजे काही अडतें असा मुळींच प्रकार नाहीं. "मलमेतन्मनुष्याणां द्रविणं परिकीर्तित | ऋषिभिस्तस्य निर्दिष्टा निष्कृति: पावनी परा| आदेहपतनात्तस्य कुर्यात्सर्वोर्ध्घदेहिकं" असें जो जो मृताचें धन घेईल त्याच्या पाठीमागे शास्त्रकारांनी लंचाड लावून दिलें आहे. बरें इतकेही असून आपल्यापाठीमागें कोणीं आपले श्राद्ध करील कीं नाहीं याचा आपल्यास संशय असल्यास आपल्या हयातीतच आपली क्रिया व श्राद्ध आगाऊ करून घेण्याचा अधिकार स्मृतिकारानीं आपणास दिला आहे; तो इतका कीं पुत्रादि वारस असतांही सदर कार्यभाग आपणास आधींच उरकून घेता येतो ! जीवच्छाद्ध म्हणतत, व हे आमच्या वाचकापैकीं पुष्कळाच्या ऐकण्यात असेलच. धर्मशास्त्राची एवढी सोय असता, मरता मरता दत्तक घेण्याची एवढी ओढ का बरें असावी ? बरें, तो तरी मन मोकळें करून घेतात काय ? नाही; तर, परलोकाचें प्रस्थान ठेवणा-याची पत्नी हयात असेपर्यंत असा करार कीं, दत्तकानें इस्टेटीची काहीं गडबड करूं नये ! 'गतानुगतिको लोको न लोक: पारमार्थिक:' दुसरें काय ?

    वर दत्तकपुत्र घेण्यास मनुस्मृतींतील जीं दोन कारणें सागितलीं त्यापैकीं पहिल्याचा विचार केला. त्याच श्लोकात सागितलेले जें दुसरें कारण म्हणजे - 'नामसंकीर्तन' तें तरी कितपत यथार्थ आहे तें पाहूं. परंतु तत्पूर्वी वाचकास एवढें कळविणें इष्ट आहे, कीं गेल्या खेपेस ज्याप्रमाणें एका हेतूचे आम्हीं अयथार्थर्व दाखविले, त्याप्रमाणी या दुस-या हेतूचाही धर्माशीं काहीं एक संबंध नसून तो फक्त व्यावहारिक आहे; हा लोक सोडून गेल्यानंतर, परलोकात प्रत्येक

   +मनु:-- "माता पिता वा दद्याता यमाभ्दि: पुत्रमापादि"