पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दत्तकाची आवश्यकता.

१३

असे आम्हांस वाटते. वेदांत स्वर्गप्राप्तीचे पुत्रोत्पत्तीखेरीज दुसरे जे पुष्कळ उपाय आहेत त्यांजवर व संततिच पाहिजे असे वाटल्यास वर सांगितलेल्या बारा पुत्रां- पैकीं एखाद्यावर, तत्कालीन लोक निर्वाह करीत असत. पुढे दिरापासून पुत्रोत्पत्ति करून घेण्याची लाज वाटण्यानें म्हणा, अगर सदर प्रघात कलियुगात चालू राहिल्यास घोर पातकें होतील या भीतीने म्हणा, क्षेत्रजादि पुत्राचा प्रचार जेव्हा बंद झाला तेव्हां आमच्या दत्तोबाचें प्रस्थ सहजच माजत चाललें, व दत्तक देण्याघेण्याच्या कायद्याची कलमें पास होऊ लागली. हीं कलमें स्मृतिग्रंथातूनच पहिल्यादा आढळ- तात; यावरून हा फेरफार स्मृतिकालींच थोडा थोडा अमलांत येत चालला असावा असे अनुमान होतें. तथापि स्मृतिकारास पूर्वीच्या द्वादश पुत्राचा विसर पडला नव्हता, हे खाली लिहिलेल्या वचनावरूनच ध्यानांत येईल. परंतु कालां- तरानें तेंही जाऊन अलीकडे तर दत्तकाखेरीज स्वर्गाचे दरवाजे खुलेच होत नाहीत असा लोकांचा समज होऊन बसला आहे ! वरील हकीकतीवरून हा समज किती यथार्थ आहे याची थोडीबहुत कल्पना वाचकास आलीच असेल. परंतु याची विशेष फोड होणे इष्ट होय, करिता त्याच्या खुलासेवार विचारास लागू
 वेदांत यासंबंधाने उदाहरणे आहेत, पण नियम नाहीत, हे मागें सांगितलेंच आहे. यावरून वेदकाली दत्तकाचे माहात्म्य नव्हते असे होते. मनुस्मृतीत दत्तक को ध्यावा, यास दोन कारणे सांगितली आहेत, ती अशी:-

अपुत्रेण सुतः कार्यों यादृक्तादृक्प्रयत्नतः
पिंडोदकक्रियाहेतोर्नामसंकीर्तनाय च ॥


 अर्थ:-- पिंडोदक देण्यासाठी, व नाव घेण्याकरितां, निपुत्रिकानें कसेंही करून मुलगा (दत्तक वगैरे) करावा-यात मनूने दत्तक घेण्यास दोन कारणे दिली आहेत. एक श्राद्ध, क्रिया वगैरे करणे, व दुसरे नाव चालविणे; पैकी पहिले कारण धर्मविषयक असून, दुसरे निव्वळ व्यावहारिक आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. इंग्रजी कोर्टाप्रमाणें धर्म व व्यवहार यांन्त्री स्मृतिकारकानी निखालस फारकत करून दिली नव्हती, हे आम्ही मागें अनेक वेळां सागितलेच आहे. कोणतीही स्मृति घेतली तरी तींत भाऊबंदांचे तंटे, चोरी व मारामारी यास शिक्षा, राजधर्म, श्राद्ध, मुंज, लभ, वगैरे धर्म व व्यवहारासंबंधी सर्व गोष्टी याचा समावेश केलेला असतो;

अक्षातायां क्षतायां वा जातः पौनर्भवस्तथा

दद्यान्माता पिता वा यं स पुत्रो दत्तको भवेत्
क्रीतस्तु ताभ्यां विक्रीतः कृत्रिमः स्यात्स्वयंकृतः
दत्तात्मा तु स्वयंदत्तो गर्भे विन्नः सहोदजः

उत्सृष्टो गृह्यते यस्तु सोपविद्धो भवेत्सुतः


 यांपैकी दत्तक व औरसखेरीज कलियुगांत इतर वर्ज केले आहेत. आपल्या दृष्टीने आतां ते अगदी रानटी व ग्राम्य दिसतात.