पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्योत्स्ना कोल्हटकर, श्री. शिरीष चिटणीस, श्री. प्रदीप कांबळे, श्री. सी. व्ही. दोशी, डॉ. श्रीकांत कारखानीस, डॉ. प्रसन्न व्हनकवरे, श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. हेमंत गुजर, डॉ. संजय देवी यांनी ही लेखमाला प्रकाशित होताना अभिप्राय दिले, त्यामुळे लेखणी लिहिती राहिली.

 त्याचबरोबर श्री. छ. प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगरवाचनालय सातारा येथील ग्रंथपाल सौ. रूपा मुळ्ये व सौ. कोडगुले व सर्व स्टाफ आणि शिपाई या सर्वांचीही खूप मदत झाली. आमचे प्रकाशक मित्र श्री. मिलिंद माने यांनी अक्षरयात्रा प्रकाशनातर्फे हा लेखसंग्रह वाचकासमोर आणला आहे.

 चित्रकार घन:श्याम देशमुख यांनी सुंदर, कलात्मक मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे काढून पुस्तकाच्या सौंदर्यात भर घातली आहे. मुद्रितशोधनाचे काम श्री. विश्वास सुतार यांनी केले, या सर्वांमुळे हा ग्रंथ दर्जेदार स्वरूपात प्रकाशित होतो आहे.

 वरील सर्वांचाच मी मनापासून कृतज्ञ व ऋणी आहे. मराठी वाचकांना हा लोकसंस्कृतीचा गाभारा' आवडेल, अशी आशा आहे.

डॉ. राजेंद्र माने
आविष्कार, गौरी ज्युप्लेक्स
विसावा पार्क, पिरवाडी रोड,
सातारा
मो. ९४२२६०००३५