श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .
दिलेलं मानधन लावणीकार शाहीर यांच्यापेक्षा चढे असायचे.
कदाचित यामुळेच साधारणपणे लावणीकारांचे लावणीरचना हे उपजीविकेचे साधन नव्हते. परशराम शिंपी होता, सगनभाऊ शिकलगार होता. प्रभाकर रास्त्यांकडे नोकरी करत होता. होनाजी पेशव्यांकडे होता; पण पिढीजात गवळी होता.
रामजोशी व अनंत फंदी ब्राह्मण कुळातील होते. त्यांनी काही काळ लावणीवर चरितार्थ केला; पण शेवटच्या आयुष्यात ते कीर्तनकार बनले.
कालानुसार तमाशातील लावणीचे रूप बदलत गेले. गण, गौळण, संगीत बारी, पदे, रंगबाजीचा फार्स असं सादरीकरण होत गेलं. तमाशात वगनाट्य आले. वेगळा बाज तमाशाला निर्माण झाला.
तसं एका अर्थानं पाहायला गेलं तर लोकगीत आणि लावणीत खूपशा गोष्टी मेळ घेणाऱ्या आहेत; पण तरीसुद्धा लोकगीतापेक्षा लावणीत आशयभिन्नता आहे. लावणीला तिचा असा खास बाज आहे. लोकांच्या तन-मनाला बांधून ठेवण्याची असामान्य ताकद तिच्यात आहे. कालांतराने लावणीची भाषा उच्चवर्गीयांची होत गेली. लावणीनं संगीताच्या दृष्टीनं विकसित रागदारीत प्रवेश केला.
एकेकाळी ‘पंचकल्याणी लावणी' 'गंगाघाटची लावणी' या लावण्या प्रसिद्ध होत्या. 'पिकल्या पानाचा देठ' ही लावणी काही जुन्या लावणी गायिका अजूनही गातात.
मन्मथ शिवलिंगापासून, जोतिराम, मध्वनाथ, गंगाधर, साताप्पा, बाळाबहिरू, परशराम, अनंत फंदी, रामजोशी, होनाजी, प्रभाकर, सगनभाऊ, महिपती, राजा सरफोजी, शाहीर हैबती यासारख्या लावणीकारांची लावणी काळाच्या ओघात अजूनही जिवंत आहे.
पिंजरा चित्रपटातील एका लावणीत जगदीश खेबुडकरांनी मोठी सुंदर शब्दरचना केली आहे.
निंदा करी तुणतुण्याची तिला 'बिन' म्हणू नये
नाही ऐकली लावणी त्याला 'कान' म्हणू नये
मराठी माणस आणि लावणी माहिती नाही असं कधीच होणार नाही. लावणी कितीही ऐकली, पाहिली, तरीही मराठी मनाची तृप्ती होणार नाही. इतकी या प्रांतात वैविध्यता आहे.
मध्यंतरी 'बैठकीची लावणी' या विषयावर एक कार्यक्रम सादर केला गेला. फैय्याज, कीर्ती शिलेदार, श्रुती सडोलीकर वगैरे नामवंत गायिकांनी वेगवेगळी लावणी गायिली. लावणी टिकण्याच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमांची गरज आहेच. हल्ली लावणीला पुन्हा बहर आलाय. लावणीला प्रतिष्ठा निर्माण होऊ लागलीय. खास स्त्रियांसाठी लावणीचे कार्यक्रम होऊ लागलेत. रंगमंचावर जाणत्यांसमोर लावणी नव्या उत्साहात पेश होऊ लागलीय. इतकंच काय पण परदेशातही जाऊन पोचली आहे. मधू