करून गाणारी स्त्री तिच्यात असते असे चित्र दिसत नाही, तसेच शृंगारिक विषयावरील रचनला जसे लावणी म्हटले जाते, तसेच पारमार्थिक, आध्यात्मिक विषयावरील रचनेलासुद्धा लावणा म्हणतात. शक्यतो वीररसात्मक, वीरगाथा, पराक्रमवर्णन हे विषय वगळता लावणीला अन्य विषय वज्ये नाहीत. शाहिरी रचनेत लावणी येत असली, तरी लावणीशिवाय शाहिरी रचनेत अनेक वेगळे प्रकार येतात. आत्तापर्यंत प्रसिद्ध असलेल्या लावण्यांच्या संग्रहात किंवा काही अप्रसिद्ध असलेल्या लावण्यांच्या हस्तलिखितांमध्ये भेदिक, शृंगारिक, प्रवासवर्णनपर, व्यक्तिवर्णनपर, क्षेत्रवर्णनपर, विधवेचे दुःख सांगणाऱ्या, कटकथात्मक, सणवर्णनपर अशा अनेक विषयांवरच्या लावण्या पाहायला मिळतात.
लावणीमधील आशय हा मराठी माणसाच्या जगण्यातून आलेला अहे. लावणीत येणारे नाट्य गोंधळी, भराडी, वाघ्यामुरळी, भांड, वासुदेव यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीवरून थोडेफार स्वीकारले आहे. पूर्वी बहुजनसमाजासमोर तमाशात सादर केली जाणारी ही लावणी लोकगीतातील तालठेक्यावर, डफ, एकतारी सारख्या वाद्यांच्या साहाय्याने गायिली जायची. नंतर हळूहळू ढोलकी, तुणतुणं, कडे ही वाद्ये लावणीच्या साथीसाठी स्वीकारली गेली. लोकगीतांमधील पद्मावर्तनी वा भृगावर्तनी ज्या रचना आहेत त्यांच्याशी मिळतीजुळती अशी लावणीची रचना आहे. त्यामुळे लावणी ही पूर्णपणे 'मऱ्हाटी' मनाची राणी आहे म्हटलेस वावगे ठरणार नाही.
खरं तर क्षणभर मनोरंजन व्हावे मनाला विरंगुळा मिळावा, हीच प्रेरणा लावणीरचनेमागे असलेली दिसते. आपले व इतरांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लावणी लिहिली जात होती. लावणीकारांनी रचलेल्या रचनांकडे पाहिले तर ते करमणुकीसाठी कधी सुभग रचना करत, तर कधी परंपरेने चालत आलेली पौराणिक कथा, वेताळपंचविशी कथा, सिंहासनबत्तीशीमधील कथा, कूटकथा व आध्यात्मिक लौकिक कटप्रश्न त्यात रंगवत. मात्र, लावणी रचना करताना ती रचना लोकांना आवडावी याची खबरदारी ते घेत. ती रचना गायिली जाताना ताल धरता येईल, याची काळजी रचनाकार घेत. काव्यातील आशयापेक्षा रचनेतील खटका, यमक, अनुप्रास यांच्यामुळं लावणी कशी रंजक व यशस्वी होईल, याची ते काळजी घेत.
लावणी शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्तीबाबत अनेकांनी वेगवेगळी मतं सांगितली आहेत. काहींच्या मते लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द आला आहे. काहींच्या मते 'लावण्य' या नामावरून लावणी असं म्हटलं जात असावं. काहींच्या मते हृदयाला चटका लावते ती लावणी. काही जण शोभिवंत वा सुभग रचना या अर्थानं लावणी शब्द योजला असावा असंही म्हणतात. काही लोक नृत्याच्या प्रकारावरून हा शब्द आला असावा कारण लावणी नाचणारी नर्तकी कंबर हलवी शंभर जागी लवून' म्हणून ती लवणी अशी लावणी असाही करतात.
लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३७॥