कल्पना सर्वांसमोर ठेवतात. खेड्यापाड्यातली माणसं श्रद्धाळू अशी तिथली स्त्री तर देवावर हवाला ठेवून आयुष्य कंठणारी. हातून चांगली कर्मे घडावीत, त्यातून गाठीला पुण्य व्हावं मुलंबाळ सुखात राहावीत, संकट येऊ नयेत, आली तर त्या परमेश्वरानं त्यातून तारून न्यावं; अशी इच्छा करणारी. श्रद्धा जपणारी भाविकतेनं परमेश्वराचं स्मरण करणारी. हे स्मरण करण्यासाठी रोजच्या कामात खास वेगळा वेळ तिला काढता यायचा नाही. मग श्रमातच ओवीच्या रूपात परमेश्वराला साद घालणारी ही स्त्री वेगवेगळ्या ओव्यात त्याला गुंतवून ठेवते.
देवाचं मानुषीकरण करणं हे तर अनेक ओव्यांत दिसून येतं. देवांतले एकमेकातले संवाद मोठ्या विलोभनीयरीत्या ओवीत गुंफले आहे. विठ्ठल रखुमाई यांच्यातला संवाद अतिशय सुंदर रीतीनं एका जात्यावरच्या ओवीत आढळून येतो.
स्त्रीमधला मत्सर, नवऱ्यासंबंधीचं प्रेम हे जितकं सर्वसामान्य संसारात दिसतं, तसेच ते देवांच्या संसारातही मांडण्याचा प्रयत्न ही ओवी गाणारी स्त्री करते. जनीबद्दल विठ्ठलाला वाटणारं प्रेम आणिलोकसंस्कृतीचा गाभारा ॥ २९॥