( ९७ ) छ सत्ता आली होती. सेनापतीची सर्व तिजोरी व सघ बसूल पिलाजीचेच ताज्यांत होता. यामुळे त्याचा विरोधी जो अभ्याग त्याची चांगलीच खोडकी पिला- नीत मोडतां आली ह्या अभयसिंगाशीं तंटे करण्यांत त्यास चांगलेच यश येई, कारण गुजरायेंतले सर्व लोक पिलाजीस फारच अनुकूल होते. अखेर पिलाजीचा त्यास इतका दरारा झाला कीं, निरुपायानें पिलाजीस ठा मारण्यासाठी दोन मारवाडी तयार करावे लागले. त्यांन डाकोर येथें सन १७३२ साली पिलाजीम ठार केले. बायकहो ! पिलाजीचें संक्षिप्त चरित्र मी आपणापुढे मां- डिलें आहे. शिवछत्रपतांचे राज्यवृक्षास पाणी घालणा- या माळ्यांपैकी पिलाजी हा एक असल्याने त्याचें साप्रवृत्त देणें वाजवी होते. परंतु काही अडचणीमुळे तें देतां आलें नाहीं. असो. ही उणीव केव्हां तरी भरून काढण्याचे श्रेय भार्ली घेऊं एवढेंच आश्वासन देऊन ठेवितों. एकंदरीत पिाजी हा मोठा हुशार, चलाख व कसलेला सरदा होता. लढाई कशी करावी, कोगत्या प्रसंगी कशा तऱ्हेचें वर्तन ठेविले पाहिजे, काय केले असतां आपल्या पक्षास जोर येईल इत्यादी गोटी तो चांगल्या रीतिनें जागत होता. लहानशा मराठेकुळांत उ- स्पन होऊन बाजीरावासारख्या पराक्रमी योद्धयाशीं ज्याने टक्कर दिली तो कांही सामान्य पुरुष नव्हता है सिद्ध होतें. सारांश स्वपराक्रमानें, कर्तबगारीनें व धैर्यानें स्याने जी राजकर्त्याची पदवी मिळविली तीस तो सर्व- बैष योग्य होता. यांत बिलकूल संशय नाहीं.
पान:लोकमित्र १९००.pdf/९७
Appearance