Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९५ ) चूक आहे असे दिल्ली दरबारास न वाटून ह्या तहास संमति न देतां बुलंदास फार दोषदिला. व त्यास सुने- दारीवरून दूर करून त्या जागेवर जोधपुरच्या अभ यलिंगास सुभेदार नेमिलें. सरबुलंद ह्यानें अमदाबादे नजिक अदालज ह्या गांवीं अभयसिंगास पादाक्रांत केले. पण पुनः कांहीं सवलतींवर त्याने माचार घेतली. व सुभेदारी अभयलिंगाचे स्वाधीन केली ( इ० स० १७३०) दुसरी गोष्ट ही कीं, ह्यामुळे मराठे सर- दारांत दुही माजली. नवीन झालेल्या तहान्वयें पिला- जीपासून सरचुलंदास राखण्याचें पेशव्यांनी कबूल केलें होतें. त्याप्रमाणे पेशव्यांनी सन १७२९ मध्ये आपल्या भावास सरबुलंदचे मदतीस पाठविलें. त्या- वेळी चिमाजीआप्पानें पेटलाद परगणा लुटून फस्त केला. पुढे अभयसिंग सुभेदारीवर भाल्यावर, बाजी- रावाने त्यापाशी पिलाजीस गुजरायेंतून काढून लावण्यासाठी बोलणे लाविलें. हे वृत्त पिलाजीस समज- तांच त्यानें आपले मदतीस बांडे ह्यास बोलाविलें. व सेनापतीस हकिकत कळवून त्याचीही मदत संपादिली. ह्या त्रयींस बाजीरावाचा हाडवैरी जो निजान तोही येऊन मिळाला. ह्या चौघांनी अशी मसलत केली की, एकेच वेळी दोन ठिकाणी बाजीरावाची तारंबळ उडवून त्याची फजिती करण्याचा विचार केला. बाजी- रावास, चिमाजीआपा, उदाजीपवार, होळकर, शिंदे वगैरे शूर सरदार अनुकूल होते. सन १७३१ मध्ये बडोद्यास वेढा देण्यासाठी बाजी- राव निघतो आहे तोच त्यास असे वर्तमान समजले की,