( ९४ ) पिलाजीनें बडोदें वगैरे प्रांत घेण्याचा पुष्कळवेळां प्रयत्न केला परंतु तो निष्फळ झाला. सरबुलंदास आतां है नसतेच विघ्न उपस्थित झालें. त्यास पर्के समजलें कीं, गायकवाडाशी तह केल्यानें पेशव्याचे लचांड सुटणार नाहीं तर पेशव्याशी तह के- स्याने गायकवाडाचे विघ्न टळेल. ह्मणून त्यानें पेशव्यांस चौथाई सरदेशमुखीचे हक्क देण्याचे कबूल केले. पण त्याने अशी अट धरिली होती कीं, पेशव्यांनी आमचे मदतीकरितां २५०० घोडेस्वार-तेथील जमीनदारांचे व गरीत्र रयतेचे -इतर मराठे सरदारांपासून उपद्रव न होण्याकरितां दिले पाहिजेत. हे मराठे सरदार ह्मणजे गायकवाड व इतर भील लोक हे होत. इ० स० १७२७ मध्ये गायकवाडाचे दैव चांगले अनुकूल होते. त्याने ह्यावेळी उदाजीपत्राची चांगली रग निरविली; व शिवाय डभोई आणि बडोदें हीं दोन्हीं शहरे परत हस्तगत करून घेतली. व इकडे त्याचा मित्र बांडे ह्यांने चांगनेर सर केले. इतके दिवस वाटाबाट चाललेला पेशवे आणि सर बुलंद ह्यांमधील तह अखेर सन १७२९ मध्यें ठरला. व त्या अन्वयें दोवांनीं शर्ती पाळण्याचे मान्य केलें. ह्या वेळी निजाम उल्मुल्काचा बाजीरवानें पराभव केल्या मुळे त्याची यशकिर्ती जकडे तिकडे प्रेरित झाली होती. वरील तहांत ह्या दोन गोष्टी ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत की, प्रथमपासून दिल्ली दरबारने बुलंदास मदत पाठविणे योग्य होतें ती न पाठविल्यामुळे पेश- व्यांशीं बुलंदास तह करणे भाग पडलें. ही आपली
पान:लोकमित्र १९००.pdf/९४
Appearance