Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ ) दिला. हे पिलाजीनें कृत्य पाहून रुस्तुमअलीस फार बाईट वाटले. व आतां शत्रूचे हात लागण्यापेक्षां मरण परे असा विचार करून त्याने वसो येथें आत्म- घात केला. पिलाजीस ह्या मोठ्या कर्तबगारीचें बक्षीस झणून, हमीदखानाने बांडे यास कबूल केलेल्या गुज राधेच्या सर्व चौथाईचा निम्में भाग दिला. ही गोष्ट इ. स. १७२५ त घडली. ह्या चौथाईच्या हिशेरशीमुळे बांडे व गायकवाड ह्यांचे दरम्यान कलागती सुरू झाल्या. हमीदखानमियानें तरी हा कावाच केला होता. त्यास असे वाटलें कीं, ह्या उभयतांत ह्या गोष्टीनें चुरस उत्पन्न होऊन आप- णांस सर्वच पदरांत टाकावयास सांपडेल ! व हा त्याचा हेतू अगदी बरोबर होता. खंबायत येथें तर ह्या उभ यतां मरहट्ट वीरांची चकमक उडाली. इतक्या निकरा- वर जेव्हां प्रकरण आले तेव्हां हमीदखानास अशी पंचाईत पडली कीं, दिल्लीहून येणाऱ्या सैन्याशी टक्कर देण्यास आपणांस कोण मदतनीस मिळेल ? शेवटीं हमी- दुखान न्याय करावयास लागले आणि अर्से ठगवलें कीं, दोघांची चौथाई वसूल करण्याचे प्रांतामध्यें महीन- दीची सीमा असावी. व तीचे उत्तरथडीचे प्रांतावरील चौथाई कंठाजीने घ्यावी. व दक्षिणथडीची पिलाजीनें घ्यावी. ह्या ठरावाबरहुकूम गायकवाडाचे वांट्यास ब- डोदें, नांदोद, चांपानेर, भडोच आणि सुरत हे परगणे आले. काही लोकांचें बडोदें प्रांताविषयीं असें ह्मणणे आहे कीं, आरास येथील लढाई झाल्यावर पिलाजी तसाच ताबडतोब बडोद्यास आला व बडोद्यास वेढा