( ९० ) रुस्तुम अल्लीस जेव्हां आपल्या भावाची कच्ची हकि- कत समजली तेव्हां त्याने पिलाजीशीं समेट करण्याचा व त्याची मदत घेण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे पिलाजीस नानात ऱ्हेनें वश करून त्याची मदत संपा- दिली. पुढे त्यापहवर्तमान हमीदखानाची दाद घे- ण्यासाठी अमदाबादेस निघून गेला. बडोदाप्रांत टाकून फझीलपूर ह्या ठिकाणी महीनदी उतरून पलीकडे आल्यावर, शत्रु पटेलाद परगण्यांतील आरास गांवीं आहे असे त्यांस समजले. तेव्हां तसेच आरासगांवीं जाऊन लढाईस प्रारंभ केला. प्रथमतः रुस्तुमअल्लीची चांगलीन सरशी झाली. परंतु रुस्तुम अल्लीस न कळ- वितां विलाजीनें हमीदवानाशीं एक गुप्त तह केला होता. त्या तहान्वयें, रुस्तुमअल्लीने जेव्हां तोफखा- न्याची देखरेख पिलाजीकडे सोपविली, तेव्हां भर ल ढाईमध्ये त्याच्याच तोफा त्याजवर सोडून मोठ्या
- विश्वासघातानें, पिलाजीनें हमीदखानास जय मिळवून
● ह्याच विश्वासघातासंबंधे इंग्रजी इतिहासकारांनी पिलाजीस दूषण दिले आहे. पण आमचा या इंग्रजी इतिहासकारांस असा प्रश्न आहे कीं, लांडे केवने उमचिदापार्शी किती विश्वासघात केला बरे ? लॉर्ड के स्वजातीय पडला व पिलाजीराव पडला मराठा | तेव्हा स्वजातियांचे पोवाडे गाण्यात आंग्ल इतिहास- कारांनी आपली बुद्धिमत्ता खर्च केली यांत नवल ते काय ? जो झणून राजकारहमानी आहे त्यास अशाच तऱ्हेने बहुनाकांक- णभर जास्त असे विश्वासघात करावे लागतात. सत्त्वस्थ राजांची महिमा ह्या कली गेली आहे बोनापार्ट झाले, माझिनी झाले किंवा कोणीही झाले तरी राजकारस्थानांत विश्वासघात, कापव्य त्यादि गुण अमावयाचेच! तशाच प्रकारचा गुण पिलाजीच्या भागी होता मात अग्लिइतिहासकारांनी दूषणे ठेवण्याचे कांहीं प्रयोजन नव्हतें.