असत विरह गोष्टी, वागवी त्या न लक्षी विदित करि मला तूं एवढे सारसाक्षी उपवनि किर, केकी, कोकिला पाळिल्या मी असति सकल कां तीं पांखरें सौख्य धामी १२ , तुम बहुत असे गे आवडी दागिन्यांची ह्मणुनि करविलीं मी कंकणे माणिकांची मुदित मन तुझें तें व्हावया मुद केली करविलि नथ, वांकी, मुद्रिका, रत्नवाळी १३ लवकरचि तुला र्ती आणितों द्यावयाला रुससिल मग कां तूं सांग या त्वप्रियाला अधिक तुज न मातें सांगवे चारुगात्रे
- सतत अशिच घाडी या विहारीस पत्र १४
माझी किनरी आणा. कवीत कालिदास तद्वत् गवयांत तानसेन याची फार तारीफ करितात. या तानसेनाविषयीं एक दंत कथा ऐकिवांत आहे ती अशी:-तानसेन हा स्वभावानें अगदी शांत, मनाचा मोकळा व प्रेमळपणाने भरलेला असा मनुष्य होता. याची आपल्या स्त्रीवर अतिशय प्रीति होती. तो तिला जीव की प्राण करी. दररोज प्रातःकाळी तिच्या उशाशी बसून घटका दोन घटका गायन केल्याविना तो कधींच बाहेर पडत नसे. हा प्रातःकाळी गात बसे तेव्हां, त्या वाटेनें एक कारागीरही प्रति दिवशी कामावर जात असे. त्यानें त्याचे गाणे