( ८६ ) ट्याची व ह्याची पहिली भेट खानदेश जिल्ह्यामध्ये नवापूर ह्मणून एक गांव आहे तेथें पडली. पिलाजीची एकंदर वर्तणूक पाहून सेनापतीने त्यास आपल्या पथ- कांत शिलेद्वारीची जागा दिली. पुढे जसजसा उत्तरोत्तर त्याचा पराक्रम अधिकाधिक दृग्गोचर व्हावयास लागला तसतसा सेनापतीचा पिलाजीविषयीं अधिक बंधुभाव वाढावयास लागला. व त्याने एकदम त्यास २०० मनु- व्यांचा ताबा दिला. पुढे सुरतेच्या स्वारीत पिलाजीनें फारच पराक्रम केल्यामुळे सेनापतीने त्यास सर्व पागेचा अविकार दिला. ह्याच सुमारास आणखी दोन मराठे सरदार उदयास आले. त्यांचा व पिलानीचा फारच निकट संयंत्र येऊन अवेर प्रकरणे हातघाईवर भालीं. हे दोन सरदार बाटले ह्मणजे उदाजीपवार व कंठाजी कदम बांडे हे होत. कदमबांडे ह्यांनी नवापूर हे आपल्या हद्दींती अस- क्यामुळे सेनापतीस तेथे रहाण्याचे व टार्गे देण्याचे प्रयोजन नाहीं अशाचाचद तक्रार आणल्यामुळे पिला- जीस तेथून ठार्गे हलवून जावे लागले; परंतु पिलाजीस सुरतेच्या स्वारीचे वेळी तेथील सर्व मुलुखाची बरोबर माहिती असल्यामुळे त्यास ह्या प्रसंगी न डगमगतां आपल्या छावणीचें ठाणे हानगड येथे ठेवतां आलें. " सोनगड त्यावेळीं मेहेवासी मील लोकांचे ताब्यांत होतें " ह्या ठिकाण मुक्काम आगल्या कारणानें त्याला पुढे बभ्रा न करितां गुपचुप रीतिनें स्वाऱ्या करितां आल्या. सोनगड येथें छावणी आणतांनां पिलाजीस
पान:लोकमित्र १९००.pdf/८६
Appearance