Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०) घरलेले असते. अर्थात त्या दाबानें तेव्हढी कातडी रक्तहीन बनते. विद्युद्दिपकाचे उपयोगप्रसंगी अशाच दुर्बिणीचा उपयोग करतात. परंतु यांत्रिक रचनेंत किंचित फरक असतो. सूर्यकिरण आणि विद्युदिपकिरण ह्यांचें जरी इतर गोष्टींत सोम्य आहे तरी सूर्यकिरण अतिशय लांबून व वातावरणांतून आपणांस पोंचल असतात व दिपकरण हे अतिशय नजिकच्या परयावरून घेता येतात व त्यांस वातावरणांचा दाब- अडथळा-फारसा नसतो. शिवाय सूर्यकिरण आपणांस सरळ मिळत नाहींत अथवा स्पष्ट सागायचे ह्मणजे ते किरण सरळ रेषेने पृथ्वीवर पचत - येत नाहीत. ह्या व इतर कारणांनी दुर्बिणींचे यांत्रिक रचनेमध्ये फेर ठेवा लागतो. असो. - अद्याप ह्या चिकित्सेचा फारसा प्रसार झालेला नाहीं तेव्हां निश्चित असे आजच कांही सांगता येत नाहीं तथापि लंदन इस्पितळांतील डाक्तरांचा अनुभव व रोगी लोकांचीं शिफारसपत्रे इत्यादिकांवरून अशा चिकीत्सेने असाध्य अशा स्वचारोगांवर जालिम उपाय लागू पडतील असे मानण्यास जागा आहे. लंदन इस्पितळांत ज्यांवर ह्या चिकीत्सेचे प्रयोग केले आहेत. अशा रोगव्यथिनाचे फोटो काढून ठेविलेले आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी त्याचेवर कसे कसे परिणाम झाले व त्यांच्या रुग्णावस्थेत कसकसा फरक पडला वगैरे माहिती तेथे प्रत्येक फोटोबरोबर चिकटविली आहे | एकंदरींत मनुष्यांची शोधकबुद्धि अचाट खरी!