Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शांचे त्यांत मिश्रण असतें. इंद्रधनुष्य सूक्ष्म रीतीनें अवलोकन करणाण्यास असे दिसून येईल की, इंद्रध- नुष्याचा एका बाजूचा रंग लाल व पिंवळट असा असून दुसऱ्या बाजूस जांभळा व भस्मानी असतो. लाल व पिवळा हे रंग उष्णतावाहक आहेत. जांभळा आणि अस्मानी हे रसायनीकच किरण आहेत असा समज आहे. ह्मणजे ते उष्णता रहित आहेत, पण त्यांच्यायोगे साकार्य घडतें. उदाहरणार्थ, हैद्रोजन आणि क्लोराईन हे दोन बायु एका कांचपात्रांत एकत्र करून ठेवले व त्या कांचपात्रावर जर लाल रंगाचे किरण पाडले तर त्या किरणापासून कांचपात्रांतील वायुवर काहीही परिणाम होणार नाही, परंतु जर त्या पात्रावर जांभळ्या रंगाचे किरण पाडले तर त्या पत्रां- तीळ वायुचा भडका होतो. फोटोग्राफ काढणायना ही गोष्ट लवकर उमजून येईल-अथवा ही त्यांनां ठाऊक असेलच. की फोटंग्रात घेण्याकरितां तयार केलेल्या कागदास उजेड-पांढरा उजेड-लागला असतां तो काळा होतो. परंतु तोच लाल रंगाच्या दिव्याच्या उजेडांत तो कागद नीट रहातो. कारण लाल कांच ज्योतींतील निळ्या रंगाचे किरण बाहेर येऊं देत नाही. ज्योतीतील किंवा प्रकाशांतील किरण, कातडीतून शरीरांत प्रवेश करतात किंवा नाही हे पाहण्या करितां एका शाज्ञाने प्रथम असा प्रयोगकरून पाहिला की, एका कुत्र्याचे आंगावरील कातडीचे आतील बाजूस फोटोग्राफ घेण्याकरितां तयार केलेला कागद घातला- ठेवला आणि तसाच दुसरा एक कागद दुसऱ्या कुत्र्याचे -