प्रकाश-रोग बरे करण्याची युक्ती शोधून काढली. त्या योगानें असाध्य अशा रोगांवर हटकून गुण येतो असा त्याचा स्वत:चा अनुभव आहे. इंग्छंदचे युवराज्ञीस हा प्रकार आवडून तिनें व्हाईटचापेल भागांत असलेल्या " लंदन इस्पितळांत " प्रकाशाचे प्रयोगार्ने रोग बरे करण्याची शाखा स्थापन करण्याबद्दल इस्पितळाचे चाल- कांम, शिफारस केली व स्वतःचे सुमारे ९०० पौंड खर्च करून त्या प्रयोगास लागणारी यंत्रसामुग्री आण. वून दिली. तिच्या शिफारसीवरून ते प्रयोग तेथे सुरू करण्यांत आले. रोग्यांवर प्रकाश प्रयोग करण्याची क्रिया मोठी मजेदार आहे. त्या इस्पितळांत जी वरील प्रयोगांकरितां प्रयोगशाला बांधलेली आहे त्या ठिकाणी दररोज दुपारों दोन वाजल्यापासून पांच वाजेपर्यंत वरील प्रयोग सुरूं असतात. प्रयोगशाळेत मार्गेपुढे हलणा-या खुर्वीचर रोगीलोक बसलेले असतात व मध्यंतरी एक विद्दीप टांगलेला असतो. सर्वत्र दुर्बिणी ठेवलेल्या असतात. त्यांतून प्रकाशाचें परिवर्तन होऊन रोग्यांचे शरीरावर प्रकाश पडतो. प्रत्येक रोग्यांजवळ एक दाई उभी असते. तिला मिळालेल्या सूचनेप्रमाणे ती दुर्बिणीची हालचाल करीत असते. येथे थोडेसे विशेष स्पष्टीकरण करणे जरूर आहे. प्रत्येकास ही गोष्ट अवगतच आहे कीं, सूर्यप्रकाश काय अथवा विदुद्दीपप्रकाश काय पांढरा स्वच्छ प्रकाश झटला ह्मणजे तो निर्भेळ व स्वतंत्र नसतो. इंद्रधनु- ब्यांत दृगोवर होणाज्या एकंदर प्रकाशाचें-रंगीत प्रका-
पान:लोकमित्र १९००.pdf/७५
Appearance