( ७१ ) हें सौख्य कोटुनि परी मज दैवहीना | स्वर्लोकिं ती वसति भोगित सौख्य नाना || मी जाई कोण नरका मज हे कळेना । तारी रमापति प्रभो अबला सुदीना ॥ १६ ॥ फोंडके. वक्तृत्व फार झालें ! प्रसिद्ध वक्ते आणि भाषाज्ञानी एम्, टेन यांनीं आपल्या एका भाषणांत आपला एक गंमतीचा अनुभव सांगितला आहे. एकदां वरील विद्वान एका मिशनरीचे धर्मव्याख्यान ऐकण्यास गेले होते. तेथे त्याने दुष्काळ पिडीत लोकांदयद्रावक चित्र काढले की, वरील गृहस्थ स्वतः वक्तृत्वांत इसके निपूण असता त्यांचें मन सुद्धा अगदी विदारून गेलें ! त्यांत एका क्षुधित व दीन कुटुंबाची त्या मिशनरीनें ज्या वेळेला तसवीर काढली, त्यावेळेला तर टेन साहेबांना अतिशयित पाझर फुटला! त्यावेळी त्यांच्या खिशांत चार शंभर शंभर रुपयांची बिलें होती. त्यापैकी पहिल्या पहिल्यानेच त्या दीनकुटुंबाला एक देण्याचा साहेबांचा निश्चय झाला. पुढे पुढे तर दोन देण्याचा त्यांचा संकल्प झाला. आणि जेव्हां त्या दीनकुटुंबाचे वर्णन पुष्कळच करण्यांत आले तेव्हां तर चारही देऊन टाकण्याचा निश्चय होऊन, ती वर्गणीची पेटी मजकडे आणा भर्सेहि ते मोठ्यानें ह्मणाले.
पान:लोकमित्र १९००.pdf/७१
Appearance