( ७० ) तो दुष्ट द्वेष करुनी धनि या जिवाचा | रानी नवीं फिरविला निजकांत साचा || आशा-घृत करियला कलहाग्नि दीप्त । फेंकोनि त्यांत दिधले निज सर्व आप्त ॥ ९ ॥ जो सत्कुमार मजला निजपुत्रतुल्य | तन्नाशकारक बने हृदयस्थ - शल्य || हा! जेधवां करियला स्वकरें धचा मा । तेव्हांच कां ? न पडलें, उलयोनि रामा ! ॥ १० ॥ नारायणा भटकुलोत्तम राजहंसा | सच्छीलका भरतभूप- सिरोवतंसा ॥ मारोनियां करि खरें निजतुंड कृष्ण | सोडोनि कांहीं न अतां फलश्वास उष्ण ॥ ११ ॥ - कैकेयिनें करियला वनवासि राम | हो नियती जन तिचे नच घेइ नाम ॥ प्रत्यक्ष मी वधियला सुकुमार बाल । ऐसें न कर्म करिती प्रलयाग्नि काल ॥ १२ ॥ सच्छील ती छथिली सुकुमार गंगा । आतां प्रकाश पडला मम अंतरंगा ॥ लावोनि पेटवियला वपुक्रोध-दीप । आतां न लाभ खणुनी सुविचार कूप ॥ १३ ॥ नरपुंगवारे । नारायणा गुगनिधे अन्यायि मी विसर बा मम दोष सारे ॥ सर्वांग सुंदरि सखे सुमगात्र गंगे । टाकी धुवोनि कलपा निजसत्तरंगें ॥ १४ ॥ आतां पुनः न कधिं पाप करीन मी ते । सर्वापराव शमना पदही नमीतें ॥ भेटा करा त्वरित पावन या मदंका । एथें हि घात करि ही मान घ्या न शंका ॥ १५॥
पान:लोकमित्र १९००.pdf/७०
Appearance