हा देह कां खिळुनियां बसला पलंगीं । सामर्थ्य कां न उरलें उठण्या मदंगीं ॥ हे दस्त कां नुचलती पद हि तसे कां । कां ऊर हा धडधडे मन घे कुशंका ॥ २ ॥ विप्पाड हा कवण हो बहु कृष्ण वर्ण । भेपूर हूँ कितितरी मुखहस्त कर्ण ॥ विकाल नेत्र टवकारुनि कां बधे हा । हा हंत हा ! अइह हा ! बघहंत हा हा ! ॥ ३ ॥ हा मूर्तिमान गमतो मज कालभृत्य । आला असेल चिरण्या ममकंठ सत्य || मी शक्तिहीन अबला करुं काय आतां । गेला कुठें त्यजुनि हो सुत नाथ ताता ॥ ४ ॥ हा! हाय ! हा! नचकशी कवणांसि माया । धांवा कुणीतरि खरें मज वांचवा या ॥ कोणी असा त्वरित या मजलागि रक्षा | सच्छील शत्रुचिहि ना करिती उपेक्षा ॥ ५ ॥ नाहींच येत मम कां कवणांसि कींव । वा जन्म घे खचित तो मरणार जीव ॥ हा सृष्टिचा नियम त्यागिल का ? मलाच । द्वारासि लाविलि ति कां न फुटेल कांच ॥ ६ ॥ हा सद्विचार कुठुनी मनि या उदेला । याहूनि पूर्विच न कां मम अंत झाला ॥ मानोनि नित्य मजला जर्नि वागले मी । त्याचे कसे फळ मला मिळणार नामी ॥ ७॥ जन्मोनि सार्थक मुळ नच कांहीं केलें । जंतपरी जननिच्या उदरासि आले || दुर्भार्ग आचरुनियां उनवृंद सारा । दुःखांत लोटुनि दिला खजुनी विचारा ॥ ८ ॥
पान:लोकमित्र १९००.pdf/६९
Appearance