Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अजि असे सुरलोकिंच बैसला, । तरी मुला, घरि खेळाचे एकला ॥ ५ ॥ त्यजुनियां खगबालकवृंद तो ? | मधुसुपुष्प सुंगधहि टाकितो ? ॥ मम वचे नच काय परीसतो ? । अजाचे कां अति निष्ठुर होइ तो ! ॥ ६ ॥ रवि सुमंद गति धरितो स्वतां । दिवस दुस्तर येतिल ते अतांः ॥ मग मला स्मृति होइल बंधुची । तरि हिना नच येइल सत्यची | ॥ ७ ॥ मग अतां नादेच्या पुलिनांतली । तळवटीं तरुच्या वनि जाहली ॥ पुनरपी नच दृष्टिस केलिती । कधि पडेल ! अहा विविची गती ! ॥ ८ ॥ लिखित, हाय ! असे लिहिले असे । मजसि ठाउक की असते असे ॥ अधिक प्रेम तरी करितों निकें । हंसून, खेळुन बंधुसि कौतुकें ॥ ९ ॥ अनंत-तनय, आनंदीबाईचे अंत्योद्द्वार- ( श्लोक-वसंततिलका ) हा स्पष्ट सूर्य असतां तम कोठुनी है । है काय आज नयनीं सुविचित्र पाहें ॥ हा नाद कोटुनि नभीं उठला कठोर । चित्तास भ्रांत करितो हरिकर्ण-रंध्र ॥ १ ॥