निर्बंधांत डा० विलसन् फिलिप् अर्से ह्मणतो की, अशक्त माणसांनी लौकर निजावयास जाणे जरी इष्ट आहे तरी फारवेळ होईपर्यंत झोप घेतल्याने त्यास जसा अपाय होतो तसा अपाय दुसरा कशानेही होत नाहीं. प्रातः- काळी पहिल्या जागेबरोबर किंवा त्याहीपेक्षां अगोदर तास अर्धातास उठणे ही संवय फार चांगली होय. सुदृढ माणसांपेक्षां दुबळ्यांस जास्त झोप घेणे जरूर असल्यानें प्रातरुत्थानाची संवय लावून घेण्यास प्रारंभ करतांना पहिल्या पहिल्याने त्यांस अमळ कठीण वाटेल व पुरती झोप झाली नसल्याने काही त्रासही होईल हे खरें, परंतु संवयीच्या योगाने दोन्ही अडचणींचे निवारण होऊन एकंदरीत हितावह होईल. लॉर्ड चॅनसेलरमोर हा पहांटेच्या चारवाजतां उठत असे. कवि मिलटून व इतिहासकार बिशप्पट् हेही ह्याचचेतानें उठत असत. प्रख्यात न्यायाधिश, सरमँध्युहेल हे विद्यार्थी दशेत असतांना सोळा तासपर्यंत अभ्यास करीत असत. डा० पारकर्स्ट सदोदित पांचवाजतां उठे. आर्चडिकन् पँले झाँकीन् व प्रिस्ले ही प्रचंड घेडे याचप्रमाणे स्वतः लैकर उठत व इतरांनी लौकर उठावें असा उपदेशही करीत. प्रख्यात कादंबरिकार सरकॉल्टर स्काट् ह्यानें आपल्या कादंच्यापैकी बहुतेक कादंबऱ्या 'मोठ्या पहाटे उठून लिहिलेल्या आहेत. कर लौकर निजणे असा इत्यर्थ होय. उशीरां उटल्याने प्रकृति व सौंदर्य ह्यांस हानी पोचते. निजावयास जाण्यास दहा साडे दहा वाजण्याची. वेळ उत्तम असून त्यावेळी निजले असतां ११ वाजण्याचे
पान:लोकमित्र १९००.pdf/६६
Appearance