Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाचतां सहज डोळा लागून जातो व दिवा मालविण्या- ची शुद्धि न राहिल्याने तो दुर्दैवाने अधिक वाढून अपघातही होतो. असा प्रकार ह्मणजे नेहमींच होतो असे जरी नाहीं तरी तो कधी कधी होतो हैं निर्विवाद आहे. याच भीतनें युरोपांतील वसतीगृहांचे मालक रात्री अंथरुणावर पडून वाचणाऱ्या तरुण मंडळी स आपल्या गृहांतून स्थळ देण्यास अनमान करीत अस- तात ! अंथरूण हे अभ्यास करण्याची जागा किंवा वाचनासारख्या करमणुकीचे स्थळ नव्हे ही गोष्ट साधारण विचारकरून पाहिला असतांही कळण्या- सारखी आहे. अंथरुणावर लोळत लोळत वाचर्णे जसे अहितकर आहे तद्वत त्यावर बसून डुलक्या घेणेही अहितकारक होय. झोपेचीवेळ होऊन झोप येत आहेशी वाटतांच एकदम जाऊन निजावें, उगाच रेंगाळत राहूं- नये; व योग्य मुदत पावेतों झोंप होतांच एकदम उठावें क्षणभर देखील कांकूं करूंनये. उठल्यानंतर प्रतिविधि उरकून कामधंद्यास लागावें. आयुष्य क्षणभंगुर आहे अशी कुरकुर कित्येकजण करीत असताना दृष्टीस पडतात. पण चमत्कार हा कीं, जे कोणी आयुष्याच्या क्षणभंगुरत्वाविपय कुरकुर करीत असतात त्यांच्यापैकीच कित्येकजण असें हैं क्षणभंगुर आयुष्य-वेळ - झोपेत निष्काळजीपणानें दवडीत असतात. लोक पैशाचे मोल मोठे मानितात; पण वेळेची किंमत सर्व संपत्ती पेक्षा जास्त आहे, ही गोष्ट फारच थोड्याचे लक्षांत असते. गेलेला पैसा पुन्हा मिळेल, बिघडलेली प्रकृति औषधोपचाराने पुन्हा -