Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्राचा व्यास सुमारें २१३० मैल आहे. हा पृथ्वी

पासून इतर ग्रहांपेक्षां फारच जवळ ह्मणजे सुमारें १,३८८०० मैल अंतरावर आहे. याचे विशिष्ट गुरुत्व पृथ्वीपेक्षां फार कमी आहे.

चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी आल्याच्या

योगाने सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर मात्र पडून तिच्या छामाशंकूंत चंद्र सांपडतो; यामुळे चंद्र ग्रहण होतात. चंद्रग्रहण पौर्णिमेसच संभवते कारण त्याच दिवशी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात. परंतु चंद्र कक्षेची पातळी आणि क्रांतिवृत्त यांच्यामध्ये ५० अंशांचा कोन आहे ह्मणून दर पौर्णिमेस चंद्रग्रहणें होत नाहींत.

अमांत भूमि, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत अस-

तात. आणि पुन्हां २७ दिवसांनी त्याच रेषेत येतात. त्यावेळी भूमि २७ अंश पुढे गेलेली असते, यामुळे चंद्र जरा पुढे जातो. त्यावेळी दुसरा अमांत होतो. ह्या कालास व्यवहारांत अमांत मास ह्मणतात.

प्रतियोगामधील काळाला पौर्णिमांत काल ह्मणतात.

या दोहोंचे सुमारें २९॥ दिवस भरतात.

चंद्र हा फारच लहान आहे ह्मणजे सूर्य चंद्रापेक्षां

६ कोटीपट मोठा आहे. तरी चंद्राचे स्वरूप फारच मनोहर असून ते आकाशांत वेगळा दिसते. आणि त्याची सत्ता हवेवर समुद्रावर आणि लोकांच्या कृत्यां- वर चालते असे आपण मानितों; यामुळे आपले लक्ष्य सूर्याप्रमाणे चंद्राकडेहि विशेष लागते.