५९ ) 7 S हा जो तेजाचा ठिपका दिसत आहे याला ' बुध C असे ह्मणतात. हा ग्रहमार्धेत पहिला आहे. बुच कधींच दिसत नाहीं अशी आपल्यापैकी काहींची समजून आहे, परंतु ती चुकीची आहे. आपल्या ह्या देशांत सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी कित्येक दिवस हा ग्रह स्पष्ट दिसतो. युरोपखंडांत संवि प्रकाश बराच वेळ असतो; यामुळे हा ग्रह फारच क्वचित् दिनतो. प्रख्यात ज्योतिषि कोपर्नि- कस यास मरेपर्यंत बुध पाहण्यास सांपडला नाही. कोणत्याहि दिशेस बुध दिसूं लागला हागजे २१ पासून सुमारे ४३ दिवस तो दिमतो. याचें सूर्योतर सु०३॥ कोटि मैल आहे. हा आकाराने सर्व ग्रहांत लहान आहे. हा सूर्यापासून जवळ आहे हणून दुर्मिणी वेध वेण्यास फार अडचण पडते. ह्याचा अक्ष भ्रमणकाळ २४ तास असावा व सूर्याभोवती फिरण्यास ८४ दिवस लागत असावे. या सुमारावरून बुधावरील वर्षे आपल्या वर्षाच्या चतुर्याशापेक्षा कमी ठरते. बुवाची चादणी दुतून पाहिली तर चंद्राप्रमाणें क्षय वृद्धि असल्याचें आढळते. बुधाचे चांदणीवर काय आहे याविषय आपणांस काही माहित नाहीं. बुधावर पृथ्वीप्रमाणे, जमीन आणि पाणी आहे; की चंद्राप्रमाणे तो प्रदेश उदकहीन आहे; सूर्याच्याप्रखर उष्णतेने वातावरण नेहमी मेवांनी भरलेले किंवा त्यावर वस्ती मुळीचं नाही; हें काही समजले नाही. ह्याचा घट्टपगा पृथ्वीपेक्षां जास्त आहे. F
पान:लोकमित्र १९००.pdf/५९
Appearance