( ५४ ) गणू बोळभांडच होता, तो घोडयांच्या लगामा घरून ह्मणाला, रावसाहेब, मला गाडी हांकण्याचे धोरण नाहीं झणून, आपले थोडेसे नुकसान झाले खरें पण, पानिपतच्या घनघोर युद्ध प्रसंगांत, भाउसाहेबांचें घोरण चुकल्यामुळे, किती नाश झाला बरें ? शेवटचा रावबाजी “धोरण " न ठेविल्यामुळे कसा पाजीसारखा पळत सुटला. व त्याने आपल्याबरो• वरच संपूर्ण ब्राह्मणपद बादशाहीस दक्षिणेतून कसे पळा- वयास लाविलें, हे आपल्या सारख्यांस मी सांगावें असें नाहीं !! 46 आपण तरी " घोरण ” ठेवून हल्लीं सुधारकाध्वर्युचे काम करितां काय? तसे असते- आपण घोणी असतां तर, आज आपले घर ज्ञातीबाहेर कां पडतें ? - चाक कांहीं अगी मोडले नव्हते. घरापर्यंत गाडी जाण्यास काही हरकत नाही, असे पाहून गणूनें गाडी जोहिली. तरी त्याची बडबढ चाललीच होती. शेवटीं सरस्वतीबईने त्यास दरडावून गप्प बसावयास सांगितले. तेव्हां तो मुकाट्याने घगकडे गाडी घेऊन चालला. संसारांतल्या एका पुढाऱ्याचे मुख्याचे " धोरण " चुकले तर त्यांच्या कुटुंबाला हाल अपेष्टा मेगाव्या लगतात. तेंच " घोरण " एखाद्या राजकर्त्यास ठेवितां आलें नाहीं ह्मणजे त्याच्या राज्याची कशी धुळधाण होते, हैं शेवटच्या बाजीरावाच्या उदाहरणावरून उघड समजण्या सारखे आहे.
पान:लोकमित्र १९००.pdf/५४
Appearance