( ५० ) काव्ये॑ असल्याने लोकांची त्यां संबंधानें आदबुद्धि आहे आणि अजूनही ती सतत राहील. दृश्यकाव्यासंबंधानें जर अभिमान बाळगायचा असेल तर तो वर लिहीलेल्या पद्धतीप्रमाणें जी ज्ञानामृतानें भरलेली असतील, जीत रसपरिपाक उतम उतरला असेल, ज्यांच्या आंगी वाचणाराचे मनांत मूर्तिमंत चित्र उठवण्याची योग्यता असेल आणि वाचणाराला बोध, आनंद आणि करमणूक करतील, तींच अभि मानास्पद होत. दृश्यकाव्यांचा हेतू फक्त मन रंजविण्यापुरताच असला पाहिजे असे जरी स्पष्ट आज कोणी पर्यायाने प्रत्येकाचा समज-- तरी-तसा झालेला ह्मणत नाहीं तरी निदान बहु समाजाचा समज दिसून येतो. आतां तो कशावरून व्यक्त होतो ही बजू शोधून काढण्यास फारसे प्रयास पडणार नाहीत. ज्या च्यांबद्दल एकदां बहुजन समाजाचे अनुकूल मत झालेले आहे अशा काव्याची गोष्ट क्षणभर एका बाजून ठेविली तरी आजमितीचा ह्मणजे तंतोतंत पूर्वी प्रमाणेच जरी नाहीत तरी कांहीं अंशाने तशच रसभरित सगळींच दृश्यकाव्ये टाकाऊ होतात-लिहीली जातात-असा नियम नाही आणि अनुभवही नाही. मग अशी काव् देखील का लोकादरास पात्र होऊं नयेत ! साधारणपणे आजमितीला दृश्यकाव्यग्रंथ बेचव असे तयार होतात ही समजून जरी आहे तरी त्या समजूतीच्या मानाने सर्वच दृश्यकाव्य ग्रंथांवर जी अवकृपा केली जाते ती यथार्थ कशी ? असो.
पान:लोकमित्र १९००.pdf/५०
Appearance