( ४५ ) थोडेसे पैसे नानासाहेबांकडून घेऊन लहानसी डिस्पेन्सरी काढली. तीत ते गरीब रोग्यांना फुकट औषधें देऊं लागळे. शकुंतलाबाईही माधवरात्राच्या संगतीनें थोडी बहूत वैद्यकी शिकल्या. त्याही गरीब बायांच्या दुखण्या बाण्यासंबंधी फार काळजी घेऊन औषध देऊं लागल्या. त्यांच्या या परोपकाराबद्दल पुष्कळ लोक दुर्गा देतात. हल्ली माधवराव आपल्या कामांत बरेच वाकबगार झाले आहेत. त्यांची लोकप्रियता पाहून शकुंतलेस, न नासा- हेबांस, व काकूंस मोठी धन्यता वाटते, व ती तशी वाटणें अगदी साहजीक आहे. परमेश्वर या जोडप्यास सुखी ठेवो एवढीच त्याच्यापाशी प्रार्थना आहे. प्रीति-देवतेप्रत. चाल - (लावणीची ) प्रीति-देवते ! स्फूर्ति निपजते त्वद्गगण गायने मोहिसी सकलांचीं तूं मनें ॥ धृ० ॥ वास तुझा वस्तूंत जोवरी तोंवरि ती साजिरी विलसते जणुं कांचन मंजिरी गमत ते अमृत कटु काजरा तयाचा न रुचे घुटका जरा या कुवलयनयना नयनांतें रमविती तीं वचनें त्यांची श्रवणा मधु भासती त्वत्संभोगानें रंगत से निजवृत्ती कारण यातें प्रीति-देवते ! वास तुझा ते स्थलों त्वदाभाव होतांच ॥ चाल ॥ तुजविना वस्तु दिसेना भली ॥ १ ॥
पान:लोकमित्र १९००.pdf/४५
Appearance