( ४४ ) कागदावर रेघ काढवेना. याप्रमाणे चार दिवस लोटले. शकुंतला पत्राची वाट पहात राहिली. माधवरावही पत्राचें उत्तर कसे काय लिहावें या विचारांत पडले. इकडे लग्नाचे दिवस जवळ आले. तेव्हां नानासाहे बांनी एक पत्र लिही. त्यांत त्यांनी त्यांना निघून येण्याविषयीं सुत्रविले पण माधवराव चे आईबाप त्यांच्या लहानपणीच निवर्तले होते. तेव्हां त्यांच्या विवाहाची गोष्ट त्यानांत्र विचारणे भाग ह्मणून नानासाहेब स्वतः सात दिवसांची रजा घेऊन मुंबईस गे. त्यांनां पहातांच माधवावराचा गळा भरून आला. त्यांनी नानासाहेबां- च्या पायाला घट्ट मिठी घातली व रडण्यास आरंभ केला. त्यावेळी स्वत: नानाची काय अवस्था झाली असेल याचा वाचकांनीच विचार करावा. पुढे कांहीं वेळानें परस्परांनी परस्परांस क्षेमसमाचार विचारला. नंतर नानांनी शकुंतलेच्या लग्नाविषयी आपला विचार कळवून माधवा ! मी तुला न्यायलाच आलो आहे असे कळविलें. त्यावेळचा माधवरावाचा आनंद भव र्णनीय होता. दुसरेच दिवशीं सर्व बांधाबांध करून माधवराव नानासाहेवावरावर बेळगांवास आले. त्यांची परिक्षा झालीच होती. फक्त रिझल्टच काय तो कळायचा राहिला होता. इकडे आल्यानंतर आठच दिवसांनी शकुंतलेचा माधवरावाशी विवाह झाला व तेच दिवशी माधवरावाचा पास असा रिझल्ट कळला. नानासाहेबानी आपली सर्व मिळकत शकुंतलेच्याच नांवावर केली होती. अर्थात माधवरावाचा तिच्यावर ताबा होताच. त्यांनी लगेच
पान:लोकमित्र १९००.pdf/४४
Appearance