Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) नाहीं. माधवराव ! तुह्मी त्याच्याविषयी पुष्कळ परि- श्रम केलेत पण तुमच्या देखील हातास कसंहो यश आलं नाहीं. नाना आणि आई तर सदासर्वकाळ त्याचा ध्यास करून झुरत असतात. नाना कामावर जातात एवढंच बाकी त्यांना तेथं कांहीं सुचत नाहींसं होतं. तुमचा टेलिग्राम अल्यादिवसापासून त्यांनां वरचेवर घेरी येते. आईचीही तीच दशा होते, व त्या दोघांचें दुःख पाहून मीही पांघरूणांत माझं तोंड गुरफटून रडत बसते झाले. रडण्याशिवाय दुसरं आह्मी काय करणार? आपण बसत होतां त्या खोलीत पायसुद्धां घालवत नाहीं तुमची ती शिस्तिनं ठेवलेली पुस्तकं, व व्यवस्था वगैरे पाहून मनांत शोकानीचा कल्लोळ उडून जातो. आपण मला इंग्रजी दोन बुकं शिकवलीत तो देखील उजळणी नसल्यामुळे विसरत चालली. नानांची व आईची कर्मणूक करायला काय ती मीच तेवढी राहिलें आहे. माझ्याकडे पाहून ते थोडं समाधान मानतात पण मी दुसन्याच्या घरी आज नाहीं तरी उद्यां जाणार असं मानून पुन्हां रडूं लागतात. मला त्यावेळी कांहीं सुचत नाहीं व मी चित्राप्रमागं तटस्थ उभी राहते. प्रिय माधवराव ! तुझी येऊन चार समा- धानाच्या गोष्टी सांगाल मटले तर, तुझी मा वाईट वाटते व रडं येतं असे पत्रेोपत्रींच लिहितां, तेव्हां काय करणार ! माधवराव ! आमच्या संबंधी असलेलं आपलं प्रेम नष्ट झालं काय ! आपली पत्रं वाचून मला मोठं नवल वाटतं. माझ्यावर कृपाकरून आपण येत्या सुटीत तरी इकडं याळ अशी फार फार आशा आहे. .