Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८ ) मी आपल्या पासून देहानं दूर आहे एवढंच, बाकी माझं सर्व लक्ष आपल्याकडे लागून राहिलं आहे. आपली मूर्ती माझ्या दृष्टीस केव्हां पडेल तो सुदीन असंच मी समजतें. माधवराव ! आठवण आली की, रडं कोसळतं पण काय करणार " तुह्मांला पत्र लिहायला बसलें कीं, भाऊची आठवण झाल्यावांचून रहातच नाही. आपण इकडून मेडिकल कालेजांत गेला तेव्हांची तुमची तरतरी व निश्चय पाहून नानांना व भाईला भारी आनंद झाला. मी तेव्हां व्हान ह्मटले तरी ९ वर्षांची होतें, व मलाही तुझी डाक्तर होणार ह्मणून मोठा आनंद वाटला. मी तुह्मांना घरचेवर पत्रं घाडी व तुह्मीही त्या सर्वांस उत्तरं घाडत- असा ह्मणून मला मोठी उमेद वाटे. माझा भाऊ- राया डाक्तर होईल. नंतर त्याच्या लग्नांत मी करवली होऊन खूप रुसेन, मला वहिनी वाई, वन्सं ! वन्सं ! ह्मणून हाक मारतील, अशा एक का दोन हजारों आशा करू.नमी कल्पनाशिखरावर चढून बसले, तो घाडकन सर्वच आशा घसरून पडल्या. भाऊचा प्लेगनं असा आणि तो एकाच दिवसांत नाश होईल ह्मणून मला- मलाचसं काय पण कुणाएकाला देखील वाटलं नव्हतं. गेल्या मे महि- न्याच्या सुटीत मी त्याला कितितरि गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांपैकी एखादी तरी त्यानं तुह्मांचा कळविली होती काय ? प्रिय माधवराव ? त्याच्यावर प्रसंग गुद- रला तेव्हां त्याच्याजवळ तुह्मी होता, तेव्हां त्याला तुझी डोळाभर पाहिलात तरी, पण चंडाळ पापी ह्मणून त्याचं अंतकाळी देखील - आह्मी - आह्मी दर्शन झालं