सपटंबर लोकमित्र. शकुंतला. १९०० ( एक मनोरंजक गोष्ट. ) बाहेर सरासरी दोनप्रहरचे दोन वाजून गेले होते. उन्ह सडकून पडलें होतें. अंगांत भगदी झिरझिरीत मलमलीचा सदरा घातला तरि दिखील तो केव्हां काढून टाकीन होत असे, आइस्क्रीम, लेमोनेड, आईस, असे फेरीवाले वांटने ओरडत चालले होते. त्यांपैकी लेमोने- डवाल्यास वर हाकमारून एक गृहस्थ कांहीं लेमोने. डच्या बाटल्या खरेदी करीत होता. इतक्यांत, एका पोष्टमनानें त्याच्या हातांत एक लखोटा आणून दिला. फेरीवाल्याचे पैसे वारून त्या गृहस्थाने ते पत्र फोडलें. त्यावेळी त्याच्या मुद्रेवर आनंदाचा ठसा उमटला होता. परंतु पत्र जसजता पुढें वाचू लागला तसतसी त्याच्या चेहयांत उलटा पालट दिसूं लागली. त्याच्या त्या पत्रांत काय मजकूर होता तो आमी आमच्या वाचकांकरितां खाली देतो. “ मत्प्रिय माधवराव ! आज आपणाला कित्येक दिवसांनीं हैं पत्र मी लिहिलं' ह्मणून आपण राग मानणार नाही अशी माझी बळकट आशा आहे.
पान:लोकमित्र १९००.pdf/३७
Appearance