Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४ ) हा दोहरा ऐकून स्वारी अगदींच गर्भगळीत झाली त्यानें इकडे तिकडे न पहातां तदक घराचा रस्ता भरला. घरी येऊन राजेश्रीनी आपल्या सुशील पत्नी बाजार चें कथानक कळावे व गणिकेच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावें तें सांगण्याविषयी विनविलें. तिनें या सावकारपुत्राची पत्नी 'सुशीला' नांवाची महान् पतित्रता, व व्यवहार चतुर अशी होती. पतीला सांगितले की आपल्यास उदईक जेव्हां ती पुन्हां भेटेल तेव्हां तिल खाप्रमाणे उत्तर द्यावेंः- - पान ऐसी पतली, लिंबू ऐसा रंग || पंच फूलनकी बहार, ऐसी हमारी नार ॥ ३ ॥ याप्रमाणे उत्तर देण्याची तयारी करून मारी आनं दानें आम धनिक पुत्र दुसरे दिवशी त्याच वेळी तिच्या महालांखाली रस्त्यावर उभे राहिले व ती खिड- कति उभी आहे असे पाहून स्त्रीने सांगितला ( पान ऐसी पतली. इ० ) दोहरा हाटला. तो ऐकून वेश्येने लागलेच उत्तर दिलें:- - सीखत आवे सखित जावे सीखत देत जवाब | आजका जुत्राब कल होता तो आतीथी तेरे साथ ॥ ४ ॥ - पुन्हां ह्मणाली- हे स्वस्त्रीपासून पढून येणाऱ्या सावकार पुत्रा-शुका ! ऐक:- सीखा साखा हरकोई कोना होता काल । देती पलंगडी बैठनकू चुंबन देती गाल ॥ ५ ॥ या प्रमाणें तित्रॆ धिःक्कारयुक्त भाषण ऐकून सावकार पुत्र मुकाट्यानें तेथून निघून गेला. मित्रहो ! या गोष्टी-