Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१ ) अथवा मातृ-वात्सल्य. डा.क्र. वाईजि.सातारा जगञ्चालक श्री परमेश्वराने या पृथ्वीतलावर अश कांहीं अनेक अल्हादमय वस्तू निर्माण केल्या आहेत की, मनुष्य किताही दुःखांत असो, कशाहि संकटांत अथवा कोणत्याही असो, परंतु त्या वस्तुयोगें करून तो सर्व दुःख विसरून आनंदीत झाल्यावाचून रहात नाही, त्या सर्व वस्तूंत बालक ही मोठीच अमोल्य व अलभ्य वस्तू होय ? कारण प्राचीन कवींनी हाटलेच आहे की "गृह रत्नानि बालक: " हे त्यांचे ह्मणणे अगदी अक्षरशः खरे असून याचा अनुभव नाहीं असा एकही प्रापंचिक मनुष्य प्राणी सर्व जगांत मिळावयाचा नाहीं. पितृमक्त श्रावण आपल्या मातापितरांसाठी उदक आणण्यास गेला असतां, दशरथ नें त्याचा वध केला त्या वेळी, श्रावणाच्या वृद्ध आई-बापांनी दशरथास अतितित्र शाप दिला की, दशरथा ! ज्याप्रमाणे सांप्रत आह्मीं पुत्र शोकाने विव्हळ होऊन मरण पावत भाहों. याचप्रमाणे तूं ही मरणसमयी पुत्र शोकात दुःसह यातनेने मरण पावशील ! हर ! हर ! ! किती तरी तीव्र व दुःखदायक शाप हा ! परंतु लवभरही वाईट न मानितां राजा दशरथाने त्यांस उत्तर दिले की, महाराज आपण जो मजला शाप त्याबद्द