Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) विश्रांति. रामा:- जिवलग मित्रा ! तुला इतकी अपार संपत्ति एकाएकी कशी मिळाली ? गोविंदा:- तशि युक्ति केली ह्मणून. रामाः - ती काय ? - गोविंदा:- काय ह्मणजे मी जेव्हां गरीब होती तेव्हां श्रीमंतीचा आव घातला, तेव्हां अर्थात माझ्या जवळ पुष्कळजणाच्या ठेवी आल्या, आणि अशा प्रकारें श्रीमंत झाल्यावर मी दिवाळे काढले. कां आहे की नाहीं सोपी युक्ति ? -

आई:-भ - भाज दुपारपासून तूं त्या घटिंगण पोरांत खेळत होतीस हें कांहीं बरें दिसत नाहीं. तूं आतां मोठी झालीस. मुलगी:- पण आई मी पोरांत नव्हतें खेळत. त्यांच्यात ते वामनराव होते की नाहीं त्यांच्याशी एक गमतीचा डाव खेळत होतें.

खाणावळवाला भापल्या कारकुनास ह्मणतो. "तुझी त्या गृहस्थास उत्तम सोयीची जागा दिलीत पण तो तितके पैसे देइल ना ? " 46 “हो हो. तो तितका श्रीमंत आहे. " (4 कशावरून ? " “कशावरून ह्मणने ? तो मनुष्य अगदी ह्यातारा व कुरूप असून त्याची बायको तरुण व सुंदर आहे यावरून."