( २३ ) किती दिवस अस्तित्वात राहाणार ? जे खरे शोधक त्यांचे असेच असते. प्रश्नपुढे येण्याची खोटी. त्यांनी तथ्यातथ्य विचार केला आणि ती खाण आणखी सत्तरऐशी वर्षे नि-संदेहतेनें अशीच हिरे माणकें प्रसवत राहील असे सांगितले आहे. त्या भविष्यवाद्याचे भवि- व्य बहुधा खोटें होणार नाहीं. इतक्या वर्षीत तिनें अगदी आळसाने जरी दिले तरी सत्तर कोटी पौंडांचें सुवर्ण देईल असे घरून चाकले तरी त्यांत वीसकोट पौंड निव्वळ नफा रहाण्यात चिळकूल हरकत नाहीं. यावरून आणखी नवीन खाणी जरी सांपडल्या नाहीत, तरी ज्या आहेत त्याच खूप रेलचेल उडवितील असे दिसतें आणि प्रसंगविशेषी जे वाईट होते ते चांगल्या करतां आणि चांगले होते ते वाईटा करतां असेच ह्मणावें लागतें. कारण तिकडे लढाई माजली नसती; हजारों लोकांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या नसत्या; रक्ताचे पाट वाहले नसते आणि अशाच प्रकारचें अगणित नुकसान झाले नसते तर त्या देशाचे नांवही आमच्या श्रवण पंथांत उतरले नप्ततें. पण लढाईस सुरवात झा- ल्यापासून तो देश कोठें आहे? त्याची मूळ पीठिका काय ? प्राचीन स्थिति कशी ? हल्ली काय दशा आहे ? इत्याद्यनेक प्रश्नाची चौकशी करून आह्मी त्यांची उ त्तरें घेत आहों. यामुळे तेथील खडान्खडा माहिती आझांस समजत आहे. आणि ती सुफलदायक होदो अशी जरी आपण वासना घरली तरी प्रभूचे हेतू काय अस .तील ? कोणी सांगावें !
पान:लोकमित्र १९००.pdf/२३
Appearance